Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शासनमान्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा वडवळ येथे उत्साहात संपन्न, विजेत्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड - अलिबाग आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा २०२४-२५ चे भव्य आयोजन माध्यमिक विद्यालय - वडवळ येथे शासनाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये तब्बल 45 पुरुष आणि महिला संघांनी सहभाग घेतला. विविध वयोगटातील विजेते संघ जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Oct 01, 2024 | 07:39 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

क्रीडा आणि युवक सेवासंचलनालाय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड – अलिबाग आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा २०२४-२५ चे भव्य आयोजन माध्यमिक विद्यालय – वडवळ येथे शासनाच्या वतीने करण्यात आले होते.शासनाच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत खालापूर तालुक्यातील ४५ पुरूष व महिला संघांनी विविध वयो गटात सहभागी होऊन आपल्या सांघिक खेळ कौशल्याचे प्रदर्शन केले आहे.

या स्पर्धेच्या उदघाटन समारंभाप्रसंगी रायगड जिल्हा कबड्डी संघटनेच्या उपाध्यक्षा शिवानी जंगम, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुका क्रीडा समन्वय जगदीश मरागजे, आयोजक जितेंद्र सकपाळ, वडवळ ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार,गोदरेज अँड बोईस चे मॅनेजर राजेंद्र पाशीलकर, तानाजी चव्हाण,एम डी चाळके,शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली गोळे, मुख्याध्यापक राजिप शाळा – वडवळ सुधाकर थळे, माजी सरपंच अनिल मरागजे, आणि वडवळ ग्रामस्थांसह अनेक कबड्डीप्रेमी उपस्थित होते.

हे देखील वाचा-ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह ‘या’ तारखेला सुरु होणार,आता 11 वी पासून मिळणार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ

विजेत्या संघांना जिल्हास्तरीय विजेतेपद मिळविण्याची संधी

ही कबड्डी स्पर्धा १४,१७ व १९ वर्ष वयोगटातील मुले व मुली या मध्ये खेळविल्या गेल्या. या स्पर्धेत विजेत्या व उपविजेत्या संघाना भव्य ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले तर या स्पर्धेतील विजेत्या संघाची रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे विजेत्या संघांना जिल्हास्तरीय विजेतेपद मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे.

कबड्डी स्पर्धेचा अंतिम निकाल

१४ वर्ष मुली

विजेता संघ – जनता विद्यालय – खोपोली.
उपविजेता संघ – जनता विद्यालय इंग्लिश मिडीयम – मोहोपाडा.

१४ वर्ष मुले
विजेता संघ – चिलठण विद्यालय – चिलठण.
उपविजेता संघ – सह्याद्री विद्यालय – खोपोली.

१७ वर्ष मुली
विजेता संघ – जनता विद्यालय – खोपोली.
उपविजेता संघ – माध्यमिक विद्यालय – वडवळ.

१७ वर्ष मुले
विजेता  संघ – जनता विद्यालय खोपोली
उपविजेता संघ – चिलठण विद्यालय – चिलठण.

१९ वर्ष मुली
विजेता संघ – जनता विद्यालय ज्युनिअर कॉलेज – खोपोली.
उपविजेता संघ – छत्रपती विद्यालय – वावोशी.

१९ वर्ष मुले
विजेता संघ – छत्रपती विद्यालय – वावोशी.
उपविजेता संघ – जनता विद्यालय ज्युनिअर कॉलेज – खोपोली.

हे देखील वाचा- बिर्ला महाविद्यालयातील ‘स्टार्टअप मेला’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद ! विद्यार्थ्यांच्या सर्व उत्पादनांची झाली विक्री

Web Title: Govt approved taluka level kabaddi tournament filled with excitement at wadwal selection of winning team for district level tournament

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 07:39 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.