Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये करिअरच्या वाढत्या संधी! पगारही मोठ्या रक्कमेत

मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंग ही मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक तंत्रज्ञानाचं मिश्रण असलेली वेगाने लोकप्रिय होणारी शाखा असून ऑटोमेशन-रोबोटिक्समुळे यातील मागणी झपाट्याने वाढत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 25, 2025 | 04:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंग ही शाखा अभियांत्रिकीच्या जगात वेगाने लोकप्रिय
  • प्रवेश प्रक्रिया: थेट प्रवेश, मेरिट आधारित प्रवेश आणि प्रवेश परीक्षा.
  • प्रवेश परीक्षा असल्यास प्रथम त्यासाठी वेगळी नोंदणी करावी लागते
तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे उद्योगक्षेत्रात ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि स्मार्ट मशीनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या बदलत्या परिस्थितीत मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंग ही शाखा अभियांत्रिकीच्या जगात वेगाने लोकप्रिय होत आहे. मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स आणि कंट्रोल सिस्टीम्स या चार महत्त्वाच्या शाखांचं एकत्र मिश्रण असलेली ही शाखा विद्यार्थ्यांना आधुनिक उद्योगांच्या गरजेनुसार तयार करते.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! JEE शिवायही IIT चे वर्ग घेता येतील, नोंदणी कशी करायची ते जाणून घ्या

डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स; ३ वर्षांचा करिअर घडवणारा कोर्स

पॉलिटेक्निक स्तरावर उपलब्ध असलेला डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंग हा तीन वर्षांचा तांत्रिक कोर्स असून औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष कामासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. या अभ्यासक्रमात सेन्सर्स, मायक्रो कंट्रोलर्स, रोबोटिक्स, CNC मशीनिंग, ऑटोमेशन सिस्टिम्स, हायड्रॉलिक्स-प्न्यूमॅटिक्स यांसारख्या विषयांचा समावेश असतो. उद्योगांमध्ये उत्पादन प्रक्रिया स्वयंचलित करण्यापासून ते स्मार्ट उपकरणं विकसित करण्यापर्यंत या क्षेत्रातील अभियंत्यांची गरज सतत वाढत आहे.

पात्रता निकष

या कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने दहावीमध्ये किमान 50% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे. तर अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती, OBC आणि इतर राखीव प्रवर्गांतील उमेदवारांना 5% गुणांची सूट देण्यात येते. दहावीनंतर लगेच तांत्रिक शिक्षणाकडे वळायचं असल्यास हा कोर्स विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय ठरतो.

प्रवेश प्रक्रिया

डिप्लोमा इन मेकॅट्रॉनिक्समध्ये प्रवेशासाठी तीन प्रमुख मार्ग आहेत:

थेट प्रवेश (Direct Admission)

काही पॉलिटेक्निक कॉलेजेस कोणतीही प्रवेश परीक्षा न घेता थेट प्रवेश देतात. उमेदवारांना केवळ अर्ज भरणे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते.

मेरिट आधारित प्रवेश (Merit List)

अनेक संस्था दहावीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट जाहीर करतात. जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जातं.

प्रवेश परीक्षा (Entrance Test)

काही विद्यापीठे किंवा राज्य मंडळे प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश देतात. प्रवेश परीक्षा, त्यानंतर समुपदेशन आणि जागांची वाटप प्रक्रिया अशा क्रमाने प्रवेश दिला जातो.

प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जवळपास सर्व ठिकाणी एकसारखीच असते. विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी, युजर आयडी-पासवर्ड मिळाल्यानंतर अर्ज भरून फी भरणे. प्रवेश परीक्षा असल्यास प्रथम त्यासाठी वेगळी नोंदणी करावी लागते.

अभ्यास केलात तर वाढेल झाड! ऐकायला विचित्र पण… शाळकरी मुलांसाठी विशेष मोबाईल ऍप्स

देशातील प्रमुख संस्था

मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा उपलब्ध करून देणाऱ्या काही प्रतिष्ठित पॉलिटेक्निक संस्थांमध्ये पुढील महाविद्यालयांचा समावेश आहे:

  • किरण पटेल एज्युकेशन ट्रस्ट – SVP पॉलिटेक्निक, मुंबई
  • एस. जे. पॉलिटेक्निक, बेंगळुरू
  • श्री जयचमराजेंद्र पॉलिटेक्निक, कर्नाटक
  • अयप्पा पॉलिटेक्निक कॉलेज, तामिळनाडू
  • बीएस पटेल पॉलिटेक्निक, मेहसाणा (गुजरात)
  • सरकारी पॉलिटेक्निक निलोखेरी (हरियाणा)
  • सरकारी पॉलिटेक्निक रमंतपूर (तेलंगणा)
भविष्यातील संधी

मेकॅट्रॉनिक्स अभियंत्यांची मागणी ऑटोमोबाईल, रोबोटिक्स, उत्पादन उद्योग, एरोस्पेस, हेल्थकेअर उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग अशा अनेक क्षेत्रांत सातत्याने वाढत आहे. ऑटोमेशन आणि इंडस्ट्री 4.0 च्या युगात या क्षेत्रातील करिअर संधी अधिक विस्तारत जाणार आहेत.

Web Title: Growing career opportunities in mechatronics engineering

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 04:10 PM

Topics:  

  • National Engineers Day

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.