फोटो सौजन्य - Social Media
NEET परीक्षा पास करणं म्हणजे डॉक्टर होणं निश्चित झालं, असा गैरसमज अनेक विद्यार्थी आणि पालकांमध्ये असतो. मात्र, सत्य हे आहे की NEET पास करणं म्हणजे फक्त पहिलं पाऊल आहे. खऱ्या अर्थाने डॉक्टर बनण्यासाठी विद्यार्थ्यांनी इतरही महत्त्वाचे टप्पे पार करणं गरजेचं आहे. हे टप्पे कोणकोणते आहेत? चला तर मग जाणून घेउयात.
यावर्षी लाखो विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा पास केली असली तरी भारतात केवळ सुमारे 1.18 लाख MBBS सीट्स उपलब्ध आहेत. याचा अर्थ असा की स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. यावर्षी जनरल कॅटेगरीसाठी NEET कट-ऑफ 686 ते 144 पर्यंत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी MBBS ऐवजी BDS, BHMS, BAMS, BPT किंवा B.Sc. Nursing, Pharmacy यासारख्या वैकल्पिक कोर्सकडे वळत आहेत.
NEET नंतर लगेच MCC (Medical Counselling Committee) ची काउंसलिंग प्रक्रिया सुरू होते. यात All India Quota (AIQ), Deemed Universities, AIIMS, JIPMER, ESIC आणि AFMS यांचा समावेश असतो. या काउंसलिंग प्रक्रियेसाठी वेळेत नोंदणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फॉर्म भरून सबमिशन करणं अत्यावश्यक आहे.
काही राज्यांनी काउंसलिंग नोंदणीची मुदत वाढवली आहे. उदा. कर्नाटक राज्यात 17 जुलै 2025 पर्यंत नोंदणी करता येईल. त्यामुळे वेळेत माहिती घेत राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुमची रँक आणि स्कोअर पाहून तुम्हाला कोणत्या राउंडमध्ये आणि कोणत्या कॉलेजमध्ये संधी मिळेल, हे ठरतं. अनेक वेळा मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कट-ऑफ कमी असतो. त्यामुळे कमी स्कोअर असतानाही सरकारी किंवा खासगी महाविद्यालयात प्रवेशाची शक्यता असते.
MBBS मिळालं नाही तर काय?
जर एखाद्या विद्यार्थ्याला MBBS सीट मिळाली नाही, तर त्याने निराश न होता B.Sc. Nursing, BPT, B.Pharm, Hospital Management, Paramedical Courses यासारख्या कोर्सचा पर्याय निवडावा. काही कोर्सेसमध्ये NEET शिवायही फक्त 12वी किंवा ग्रॅज्युएट मेरिटवर प्रवेश मिळतो.