Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह ‘या’ तारखेला सुरु होणार,आता 11 वी पासून मिळणार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ

ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांच्यासोबत नागपुरात ओबीसींच्या विविध संघटनांची बैठक झाली त्यावेळी ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाबाबत मंत्री सावे यांनी मोठी घोषणा केली तसेच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे लाभ अकरावीपासून मिळणार असल्याचा निर्णय ही जाहीर करण्यात आला.

  • By नारायण परब
Updated On: Oct 01, 2024 | 04:29 PM
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह 'या' तारखेला सुरु होणार,आता 11 वी पासून मिळणार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह 'या' तारखेला सुरु होणार,आता 11 वी पासून मिळणार ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ

Follow Us
Close
Follow Us:

आज मंगळवार दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी नागपूर येथे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजातील विविध संघटनांच्या समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या मॅरेथॉन बैठकीमध्ये ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विदर्भातील २९ ओबीसी संघटनांच्या नेत्यांसोबत सुमारे  दोन तासांची चर्चा झाली. त्यामध्ये ओबीसी समाजाच्या समस्यांवर गंभीर चर्चा करण्यात आली. या बैठकीत ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यातील वसतिगृह येत्या ६ ऑक्टोबरपर्यंत सुरू करणार असल्याची घोषणा मंत्री सावे यांनी केली.

या बैठकीत ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, ओबीसी बहुजन कल्याण मंत्रालयाचे उपसचिव दिनेश चव्हाण, आर्थिक विकास महामंडळाचे अरविंद माळी आणि ओबीसी बहुजन कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिल्लारे उपस्थित होते. बैठकीची सुरुवात ओबीसी अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे यांनी केली, ज्यांनी ओबीसी संघटनांच्या समस्यांवर सखोल चर्चा घडवून आणली.

हे देखील वाचा- Google Internship साठी अर्जप्रक्रिया सुरु, विद्यार्थ्यांना इंटर्नशीपमध्येच मिळणार लाखो रुपयांचे पॅकेज

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे लाभ अकरावीपासून

ओबीसी संघटनांनी मांडलेल्या समस्यांवर तत्काळ तोडगा काढण्याची ग्वाही देत, राज्यातील महायुती सरकार हे समस्यांचे निराकरण करण्यास कटिबद्ध असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले.  जातनिहाय जनगणना करण्याच्या ओबीसींच्या मागणीवरही त्यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर इतर मागास वर्गाच्या वसतिगृहांना लाभ देण्याची शिफारस त्यांनी केली. या संदर्भामध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचे लाभ अकरावीपासून विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णयही बैठकीत जाहीर झाला.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना 

राज्यातील मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना शासनाकडून सुरु करण्यात आली आहे.  या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊन त्यांच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे. योजनेअंतर्गत, विद्यार्थ्यांना दरवर्षी 60,000 रुपये शैक्षणिक खर्चासाठी मिळू  शकतात.

या मुद्द्यांवरही झाली चर्चा

विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची संख्या वाढवून २०० करावी, ओबीसी समाजासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यालये सुरू करावीत, वसतिगृहांचे नामकरण ‘ओबीसी बहुजन विद्यार्थी वसतिगृह’ करावे, यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. विदर्भातील विविध ओबीसी संघटनांनी शिक्षण, आरक्षण, आणि सरकारी नोकरीतील आरक्षणासंदर्भातील समस्यांवर आवाज उठवला.

विदर्भातील २९ संघटनांचे प्रतिनिधी आज झालेल्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. सहभागी झालेल्या संघटनेमध्ये ओबीसी सेवा संघ, ओबीसी जनमोर्चा, स्टुडंट्स राईटस असोसिएशन ऑफ इंडिया यांसारख्या संघटनांनी विविध मागण्या मांडल्या. त्यावर मंत्री सावे यांनी  सकारात्मक विचार करण्याचे आणि यथोचित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

Web Title: Hostels for obc students to start from october 6 benefit of gyanjyoti savitribai phule aadhaar yojana from 11th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 04:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.