फोटो सौजन्य - Social Media
आपल्या करिअरमध्ये प्रत्येकाला ग्रोथची आशा असते. पण कधी काळी कामाचे ठिकाण त्या आशेची निराशा करते. कामाच्या ठिकाणी असलेले वातावरण आपापल्या करिअरची दिशा ठरवतात. कामाच्या ठिकाणच्या वातावरणाचा डायरेक्ट परिणाम आपल्या कार्यक्षमतेवर होतो. जर वातावरण चांगले असले तर आपली कार्यक्षमता नेहमी चांगलीच असते. परंतु, वातावरण पूरक नसले तर ताणामुळे मानसिक त्रास निर्माण होतो. वाढत्या मानसिक त्रासाचा दुष्परिणाम व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर तर होतोच, पण हळू हळू हा त्रास व्यक्तीच्या मनावर ताबा मिळवतो आणि त्याने व्यक्तीला कधी कधी टोकाचे पाऊल घेण्यास भाग पाडते, याला कारणीभूत मानसिक त्रास असतो.
हे देखील वाचा : शासनमान्य तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा वडवळ येथे उत्साहात संपन्न, विजेत्या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
जर तुम्ही तुमच्या कामावर नवखे आहात किंवा ऑफिसला नुकतेच जॉईन झाले आहात तर वेळीच तुमच्या कामाच्या ठिकाणी असणाऱ्या वातावरणाला ओळख आणि सावध व्हा. काही मुद्दे आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणच्या वातावरणाला ओळखू शकता. एम्प्लॉईज लोकांचा मूड पाहता तुम्ही कामाचे वातवरण ओळखू शकता. जर तेथे काम करणारे कर्मचारी हौशेने काम करता असतात. त्यांच्या चेहत्यावर नेहमी स्मित असते. कामाचे टेन्शन असणे सामान्य आहे, परंतु त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होणे फार भयंकर आहे.
जर कामाच्या ठिकाणी असणारे लोकं नेहमी चांगले वागतात. जास्त मानसिक तणावामध्ये दिसून येत नाहीत, तर कदाचित ते वातावरण चांगले असण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी संवाद असणे फार महत्वाचे आहे. जर कर्मचारी येतात, शांत बसतात आणि काम झाल्यावर निघून जातात. तर या बोर ठिकाणालाच टॉक्सिक वातावरण असलेले ऑफिस म्हणता येईल.
हे देखील वाचा : IBPS लिपिक प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला, ‘या’ लिंकवर थेट पाहा तुमचा रिझल्ट
कर्मचारी किती दिवस तेथे स्वतःला टिकवत आहेत? याचे उत्तर शोधणे फार महत्वाचे आहे. कमी कार्यकाळ म्हणजे ऑफिसच्या मॅनेजमेंटने या गोष्टीवर विचार करण्याची गोष्ट आहे. निर्णयांमध्ये अस्पष्टता असणे, कामगारांससोबत कमी संवाद होणे किंवा पद्धतशीर व्यवहाराचा अभाव असणाऱ्या कंपन्यांकडून स्वतःला लांब ठेवणे कधीही उत्तम असते. कामाच्या ठिकाणी भेदभाव नसावा. नेतृत्व करणारा व्यक्ती खरंच नेतृत्व करण्यासारखा आहे कि नाही? यावर लक्ष द्यावे. तसेच कामाच्या ठिकाणी पारदर्शकता नसणे म्हणजे ऑफिसचे वातावरण टॉक्सिक आहे.