फोटो सौजन्य - Social Media
शेअर मार्केटमध्ये बारावीनंतर करिअर करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक विशेष लेख आहे. शेअर बाजारात करिअर कसे करतात? शेअर मार्केटमध्ये करिअर करण्यासाठी काय काय पर्याय उपल्बध आहेत? या लेखातून जाणून घेऊयात.
सध्या शेअर मार्केटमध्ये तरुणांची हवा आहे. बहुतेक तरुण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. या गोष्टीचा फायदा घेत, तुम्ही शेअर मार्केटमध्ये करिअर घडवू शकता. गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार आणि शेअर मार्केट यांमध्ये एका दुव्याची आवश्यकता असते. शक्यतो, हा दुवा आज काल काही ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स असतात, परंतु, अनेक जण ऑफलाईन गुंतवणूक करण्यावर विश्वास ठेवतात. अशावेळी, स्टॉक ब्रोकर या अधिकाऱ्याची गरज लागते.
स्टॉक ब्रोकरचे काम काय असते?
स्टॉक ब्रोकर गुंतवणूकदाराला शेअर मार्केटशी जोडून ठेवतो. गुंतवणूकदाराच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्याला मार्गदर्शन करण्याचे काम स्टॉक ब्रोकर करत असतो. पैसे कधी गुंतवावे? कसे गुंतवावे? या सगळ्या बाबींची माहिती गुंतवणूकदाराला स्टॉक ब्रोकर देत असतो.
स्टॉक ब्रोकर कसे बनावे?
जर तुम्ही वाणिज्य शाखेतून येत असाल तर नक्कीच स्टॉक ब्रोकर बनण्यासाठी तुमच्या करिअरचे दरवाजे आधीच खुले झालेले आहेत. बँकिंग आणि फायनान्स विषयात किमान एका वर्षाचा डिप्लोमा करत तुम्ही स्टॉक ब्रोकर या पदासाठी काम करू शकता. या कोर्समध्ये शेअर मार्केट तसेच अर्थ क्षेत्रासंबंधित सर्व बेसिक गोष्टी शिकवल्या जातात. शेअर मार्केटवर आधारित अनेक कोर्सेस ऑनलाईन शिकवले जातात, त्याचा आधार घेत तुम्ही स्टॉक ब्रोकर बनू शकता.
अनेक जण शेअर मार्केटकडे वळत आहेत. त्यामुळे स्टॉक ब्रोकरच्या आवश्यकता वाढत आहे. याचा फायदा घेत तुम्ही महिना चांगले कमवू शकता, तसेच स्वतःची एक फार्म खुली करू शकता. स्वतः स्टॉक ब्रोकर असल्याने तुम्हीही उत्तम निवेशक बनून छान पैसे कमवू शकतात.