फोटो सौजन्य - Social Media
तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ServiceNow च्या अहवालानुसार, 2028 पर्यंत भारतातील टेक क्षेत्रात 27 लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. या नोकऱ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे आतापासून यासाठी तुम्हाला खंबीर राहावे लागेल. आज आम्ही तुम्हाला या लेखात, गुगल मायक्रोसॉफ्टचे असे काही कोर्स सांगत आहोत जे करून तुम्ही तुमची तयारी सुधारू शकता आणि तुमच्या ज्ञानात अजून भर पडू शकता. मुख्य म्हणजे, गुगलचे हे कोर्स पूर्णपणे विनामूल्य म्हणजेच फ्रीआहेत, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या कोणतेही पैसे खर्च न करता ते सहज शिकू शकता.
गुगल एआय आणि मशीन लर्निंग क्रॅश कोर्स (Google AI and Machine Learning Crash Course)
हा कोर्स अशा उमेदवारांसाठी उपयुक्त आहे ज्यांना Python चे ज्ञान आहे पण AI चे ज्ञान नाही. AI च्या मूलभूत ज्ञानासाठी हा कोर्स महत्त्वाचा आहे. या अभ्यासक्रमांतर्गत, सुपरवाइज्ड लर्निंग आणि अनसुपरवाइज्ड लर्निंग (Supervised learning and unsupervised learning) यावर लक्ष केंद्रित केले आहे. AI अल्गोरिदम बद्दल संपूर्ण माहिती प्रदान केली आहे. यासोबतच, तुम्ही या कोर्सद्वारे डेटा तयार करणे, मॉडेल ट्रेनिंग आणि मूल्यमापन याबद्दल देखील अनेक गोष्टी शिकता येऊ शकतात. हा कोर्स Google for Developers साइटवर विनामूल्य उपलब्ध आहे जिथून तुम्ही तुमचे नाव रजिस्टर करून आणि काही आवश्यक तपशील भरून हा कोर्स पूर्ण करू शकता.
ॲएमेझॉन एआय आणि मशीन लर्निंग फाउंडेशन (Amazon AI and Machine Learning Foundation)
प्रोग्रामिंगमध्ये नवीन असलेल्या आणि AI च्या मूलभूत गोष्टी आणि टूल्स शिकू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी हा कोर्स उपयुक्त आहे. या कोर्स अंतर्गत, तुम्हाला एआय आणि मशीन लर्निंगच्या मूलभूत संकल्पनांची माहिती दिली जाईल. यासह, या कोर्सद्वारे तुम्ही AWS क्लाउड टूल्स वापरण्यास देखील सक्षम व्हाल. हा कोर्स Amazon Web Services आणि Udacity वर उपलब्ध आहे आणि पूर्णपणे मोफत आहे. यासाठी तुम्हाला तुमची नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही हा कोर्स पूर्ण करू शकता.
मायक्रोसॉफ्ट एआय फंडामेंटल्स कोर्स (Microsoft AI Fundamentals Course)
या अभ्यासक्रमासाठी उमेदवारांना कम्प्युटरचे बेसिक नॉलेज असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला कॉम्प्युटरचे ज्ञान असेल आणि AI च्या विविध क्षेत्रात त्याचा प्रभाव समजून घ्यायचा असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. या कोर्स अंतर्गत तुम्हाला AI चा इतिहास, त्याचे नैतिक पैलू आणि आरोग्यसेवा आणि अर्थव्यवस्था यासारख्या क्षेत्रांबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल. याद्वारे तुम्ही वेगवगेळ्याअनुप्रयोगांविषयी देखील माहिती मिळवू शकता. हा कोर्स AI च्या तांत्रिक गोष्टी जसे की मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क शिकवेल. हा कोर्स मायक्रोसॉफ्ट लर्न (Microsoft Learn) वेबसाइटवर उपलब्ध आहे जिथून तुम्ही थेट नोंदणी करू शकता आणि हा कोर्स विनामूल्य पूर्ण करू शकता.