फोटो सौजन्य - Social Media
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), अलाहाबादमध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदाच्या रिक्त जागांचा विचार केला जात आहे. या जागांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. असिस्टंट प्रोफेसर पदी किंवा शिक्षक पदी कामाची नियुक्तीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), अलाहाबादमध्ये असिस्टंट प्रोफेसरच्या ४४रिक्त जागांसाठी या भरती प्रक्रियेस राबवण्यात येत आहे. IIIT बॉंबेने या भरती प्रक्रियेला आयोजित केले आहे.
महत्वाची बाब म्हणजे या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. अनेक उमेदवारांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्हीही असिस्टंट प्रोफेसरच्या या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर लवकरात लवकर अर्ज करावे. १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीमध्येच इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याचे आश्वासन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), अलाहाबादने दिले आहेत.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), अलाहाबादने असिस्टंट प्रोफेसरच्या या भरती संदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती प्रकियेमध्ये फक्त असिस्टंट प्रोफेसरच नव्हे तर प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसरच्या रिक्त जागांचाही विचार केला जाणार आहे. या भरती प्रक्रियेविषयी सखोल माहिती या अधिसूचनेमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. जर तुम्हाला या भारताविषयी आणखीन माहिती हवी असेल तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), अलाहाबादने त्यांच्या अधिकृत साईटवर अधिसूचना प्रदर्शित केली आहे. इच्छुक उमेदवार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), अलाहाबादने जारी केलेल्या या अधिसूचनेचा आढावा घेऊन या भरती प्रक्रियेसंदर्भात सखोल माहिती जाणून घेऊ शकतात.
सामान्य, OBC आणि EWS उमेदवारांना 1180 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. तर SC, ST तसेच PH प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे. एकंदरीत, SC, ST तसेच PH प्रवगातील उमेदवार निशुल्क अर्ज करू शकतात. असिस्टंट प्रोफेसर ग्रेड-2 साठी, उमेदवार पीएचडी धारक असणे आवश्यक आहे. तर असिस्टंट प्रोफेसर ग्रेड-1 साठी पीएचडी किंवा एमटेक आवश्यक आहे.