Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ISB आणि IIM अहमदाबादच्या शिरपेचात मानाचा तूरा, LinkedIn च्या जगातील सर्वोत्कृष्ट 20 एमबीए अभ्यासक्रमाच्या यादीत मिळविले स्थान

(LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक नेटवर्कने टॉप २० एमबीए प्रोग्राम्‍सची यादी जारी केली आहे. ज्यामध्ये इंडियन स्‍कूल ऑफ बिझनेस आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, या भारतीय शैक्षणिक संस्थांच्या अभ्यासक्रमांनी टॉप २० मध्‍ये स्थान मिळवत. जागतिक पातळीवर भारतीय शैक्षणिक संस्थांचे महत्व वाढविले आहे. यासोबतच नेटवर्कमध्‍ये वाढ करण्‍यासाठी व्‍यावसायिकांकरिता टॉप १० संस्‍थाही घोषित केल्या आहेत त्यात ८ भारतीय संस्थांचा समावेश आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 05, 2024 | 04:36 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

व्‍यावसायिकांना त्‍यांची कौशल्‍ये निपुण करण्‍यासोबत त्‍यांच्‍या करिअर संधींमध्‍ये वाढ करण्‍यास मदत करण्‍यासाठी लिंक्‍डइन (LinkedIn) या जगातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक नेटवर्कने टॉप २० एमबीए प्रोग्राम्‍सची यादी जारी केली आहे. ज्यामध्ये इंडियन स्‍कूल ऑफ बिझनेस, हैद्राबाद (६वा क्रमांक) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (१९वा क्रमांक) मिळवत  टॉप २० मध्‍ये सामील झाले आहेत. जागतिक यादीमध्‍ये स्‍टॅनफोर्ड युनिव्‍हर्सिटी अग्रस्‍थानी आहे, ज्‍यानंतर इन्स्टिट्यूट युरोपियन डी’अॅडमिनिस्‍ट्रेशन डेस अफेअर्स (आयएनसीईएडी), फ्रान्‍स आणि हार्वर्ड युनिव्‍हर्सिटी, यूएसए अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. ही यादी प्रत्‍येक प्रोग्रामची जॉब प्‍लेसमेंट, अ‍ॅबिलिटी टू अडवान्‍स, नेटवर्क स्‍ट्रेन्‍थ, लीडरशीप पोटेन्शियल आणि जेण्‍डर डायव्‍हर्सिटी या पाच प्रमुख आधारस्‍तंभांवर मूल्‍यांकन करते, ज्‍यामुळे माजी विद्यार्थ्‍यांकरिता दीर्घकालीन करिअर यशासाठी कोणते प्रोग्राम्‍स सर्वोत्तम आहेत हे निर्धारित करता येते.

लिंक्‍डइन २०२४ टॉप एमबीए जागतिक यादीमध्‍ये सामील असलेल्‍या टॉप २० संस्‍था:

१ स्‍टॅनफोर्ड युनिव्‍हर्सिटी
२ आयएनएसईएडी
३ हार्वर्ड युनिव्‍हर्सिटी
४ युनिव्‍हर्सिटी ऑफ पेनसिल्‍व्‍हेनिया
५ मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी
६ इंडियन स्कूल ऑफ बिझनेस
७ नॉर्थवेस्टर्न युनिव्‍हर्सिटी
८ डार्टमाउथ कॉलेज
9 कोलंबिया युनिव्‍हर्सिटी
१० युनिव्‍हर्सिटी ऑफ शिकागो
११ युनिव्‍हर्सिटी ऑफ लंडर
१२ युनिव्‍हर्सिटी ऑफ व्‍हर्जिनिया
१३ ड्यूक युनिव्‍हर्सिटी
१४ डब्‍ल्‍यूएचयू
१५ युनिव्‍हर्सिटी ऑफ ऑक्‍सफोर्ड
१६ येल युनिव्‍हर्सिटी
१७ कॉर्नेल युनिव्‍हर्सिटी
१८ युनिव्‍हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली
१९ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद
२० युनिव्‍हर्सिटी ऑफ नवर्रा

लिंक्‍डइनच्‍या टॉप एमबीए यादीचा  व्‍यावसायिकांना योग्‍य संधी आणि त्‍यांच्‍या गुंतवणूकीला मदत करण्याचा मनसुबा 

लिंक्‍डइन न्‍यूज इंडियाच्‍या वरिष्‍ठ व्‍यवस्‍थापकीय संपादक व करअिर एक्‍स्‍पर्ट निरजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee) म्‍हणाल्‍या, ”एमबीए नेतृत्‍व पदांचे ध्‍येय असो, नवीन उद्योगांचा शोध घ्‍यायचा असो किंवा स्‍वत:चा व्‍यवसाय सुरू करायचा असो करिअरला चालना देण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या व्‍यावसायिकांसाठी प्रबळ साधन आहे. पदवी मिळण्‍याव्‍यतिरिक्‍त धोरणात्‍मक विचारसरणी, नेतृत्‍व आणि समस्‍या निवारण अशी प्रमुख मागणीदायी कौशल्‍ये निपुण करण्‍याची संधी मिळते, तसेच नवीन संबंध स्‍थापित होतात, ज्‍यामुळे पदवी शिक्षण पूर्ण झाल्‍यानंतर नवीन संधी मिळतात. लिंक्‍डइनच्‍या टॉप एमबीए यादीचा महत्त्वाकांक्षी व्‍यावसायिकांना योग्‍य संधी मिळण्‍यास, त्‍यांच्‍या गुंतवणूकीला प्रभावी करण्‍यास मदत करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यासाठी त्‍यांना प्रोग्राम्‍सशी कनेक्‍ट केले जाईज, जे त्‍यांना त्‍यांची करिअर ध्‍येये संपादित करण्‍यास मदत करू शकतात.”

लिंक्‍डइनने भारतीय संस्‍थांच्‍या लक्षणीय उपस्थितीसह नेटवर्क-निर्माण क्षमतांसाठी टॉप १० एमबीए प्रोग्राम्‍सची देखील घोषणा केली आहे. नेटवर्किंग क्षमतांसाठी जागतिक स्‍तरावर मान्‍यताकृत टॉप १० पैकी आठ संस्‍था भारतात आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड यादीमध्‍ये पहिल्‍या क्रमांकावर आहे, ज्‍यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदौर दुसऱ्या क्रमांकावर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनौ तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्‍यामधून बहुमूल्‍य व्‍यावसायिक संबंधांना चालना देण्‍यामध्‍ये भारतीय संस्‍था बजावणाऱ्या मोठी भूमिका दिसून येतात.

नेटवर्कमध्‍ये वाढ करण्‍यासाठी व्‍यावसायिकांकरिता टॉप १० संस्‍था:

१ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड
२ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदौर
३ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनौ
४ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता
५ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद
६ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगलोर
७ सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस
८ इंडियन स्कूल ऑफ बिझनेस
९ ईएसएसईसी बिझनेस स्कूल
१० ईएससीपी बिझनेस स्कूल

 

एमबीए करणारे व्‍यावसायिक त्‍यांच्‍या करिअरमध्‍ये कशाप्रकारे प्रगती करू शकतात याबाबत निरजिता यांचे मार्गदर्शन:

1. नेटवर्क, नेटवर्क, नेटवर्क. तुम्‍हाला शक्‍य असेल तितक्‍या सर्वांना भेटा, शालेय कार्यक्रमांना उपस्थित राहा, पुढे जात असताना लिंक्‍डइन नेटवर्क निर्माण करा (भेटल्‍यानंतर व्‍यक्‍तींसोबतचे नाते दृढ करा).
2. प्रमुख मानवी कौशल्‍ये – टीमवर्क, सहयेाग, संवाद निपुण करा. बिझनेस स्‍कूल टीम प्रोजेक्ट्सबाबत आहे, जे तुम्‍हाला नेतृत्‍व आणि सहयोग कौशल्‍ये निपुण करण्‍याची उत्तम संधी देते.
3. लिंक्‍डइनवर पोस्टिंग सुरू करा. तुमच्‍या भेटीदरम्‍यान मिळालेली माहिती आणि तुम्‍हाला आवडणाऱ्या कोणत्‍याही व्‍यवसाय विषयावरील केस स्‍टडी शेअर करा. यामुळे तुमचे नेटवर्क वाढण्‍यासोबत तुमचा ब्रँड विकसित होण्‍यास मदत होऊ शकते.
4. एमबीएनंतर करावयाच्‍या गोष्‍टींबाबत विचार करा. तुमच्‍या मनात पदाचा विचार सुरू असल्‍यास त्‍या पदासाठी आवश्‍यक असलेल्या कौशल्‍यांचा विचार करा आणि प्रोग्रामदरम्‍यान अभ्यासाच्‍या माध्‍यमातून ती कौशल्‍ये अवगत करण्‍याची खात्री घ्‍या.
5. क्‍लब इव्‍हेण्‍ट्स, पिच इव्‍हेण्‍ट्स आणि केस कॉम्‍पीटिशन्‍समध्‍ये सहभाग घ्‍या. तुमचे प्रेझेन्‍टेशन व लक्ष वेधून घेण्‍याची कौशल्‍ये घडवण्‍याची उत्तम संधी आहेत. या इव्‍हेण्‍ट्समध्‍ये उत्तम कामगिरी रोजगारांसाठी अर्ज करण्‍यासाठी किंवा नवीन कंपनी सुरू करण्‍यासाठी उत्तम ठरू शकते.
6. इंटरर्नशिप्‍स, रोजगार किंवा कॅम्‍पस लीडरशीप पदांचा शोध घ्‍या. तुम्‍ही प्रोग्रामचे शिक्षण घेत असताना हे पदभार सांभाळू शकता, ज्‍यामुळे पदवी शिक्षण पूर्ण होत असताना संभाव्‍य प्रबळ रोजगार मिळण्‍यास मदत होऊ शकते.

Web Title: Isb and iim ahmedabad ranked in linkedins list of worlds best 20 mba courses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 04:33 PM

Topics:  

  • MBA

संबंधित बातम्या

MBA केल्याने मिळतो उत्तम पगार? काय आहे फायदे? जाणून घ्या
1

MBA केल्याने मिळतो उत्तम पगार? काय आहे फायदे? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.