JEE NEET Update: कोचिंग क्लासेसना बसणार चाप! पुन्हा एकदा १२ वीच्या मार्क्सवर ठरणार विद्यार्थ्यांची रँक?

JEE NEET Update: नीट आणि जेईई प्रवेश प्रक्रियेत १२ वीच्या गुणांना पुन्हा वेटेज मिळण्याची शक्यता आहे. नंदन नीलेकणी समितीपुढील ५४ हजार सूचना आणि 'परख'च्या भूमिकेबद्दल सविस्तर जाणून घ्या.
career
फोटो सौजन्य- सोशल मीडिया career
Published on: 
Updated on: 
  • प्रवेशात १२ वीच्या गुणांना मिळणार वेटेज?

  • नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत 'हे' सदस्य

  • नीट जेईईबाबत महत्त्वाची अपडेट

JEE NEET Update: नीट आणि जेईई यांसारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आगामी काळात मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत जेईई आणि नीटच्या स्कोअरसोबतच इयत्ता १२ वीच्या गुणांनाही वेटेज दिले जाऊ शकते.

स्पर्धा परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सला ५४ हजारांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये अनेकांनी प्रवेश परीक्षांमध्ये शालेय बोर्डाच्या गुणांना अधिक महत्त्व देण्याची मागणी केली असून, विविध राज्य सरकारांकडूनही यासंदर्भात सूचना पाठवण्यात आल्या आहेत.

स्पर्धा परीक्षांमध्ये बोर्डाच्या गुणांना वेटेज देण्याची चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जेईई मेनमध्ये ही पद्धत लागू करण्यात आली होती, परंतु नंतर ती बंद करण्यात आली. आता टास्क फोर्स पुन्हा एकदा ही व्यवस्था लागू करण्याच्या पर्यायावर गांभीर्याने विचार करत आहे.

Jui Godbole Basketball: पुण्याच्या जुई गोडबोलेची बास्केटबॉल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई; राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमक

जेईई मेनमध्ये यापूर्वी मिळाले होते ४०% वेटेज

सन २०१३ पासून जेईई मेनची अखिल भारतीय रँक निश्चित करताना १२ वीच्या गुणांना ४० टक्के वेटेज दिले जात होते. शालेय शिक्षणाला चालना देणे आणि कोचिंग क्लासेसवरील अवलंबित्व कमी करणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता. मात्र, देशभरातील विविध शिक्षण मंडळांच्या निकालांमध्ये असलेली तफावत आणि रँक ठरवताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन ही पद्धत बंद करण्यात आली. प्राध्यापक अशोक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या शिफारशीनंतर २०१७ मध्ये हा नियम हटवण्यात आला होता.

Most Expensive School in Pakistan: पाकिस्तानमधील सर्वात महागड्या शाळा कोणत्या? थेट अमेरिकन डॉलरमध्ये आकारली जाते लाखोंची फी

'नॉर्मलायझेशन' ठरणार सर्वात मोठे आव्हान

समोर आलेल्या अहवालानुसार, मेडिकल आणि इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशात बोर्ड परीक्षेच्या गुणांना वेटेज देण्यातील सर्वात मोठे आव्हान त्यांचे 'नॉर्मलायझेशन' करणे हे आहे. याचाच अर्थ, वेगवेगळ्या शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या गुणांची तुलना एका समान पातळीवर करणे आवश्यक ठरेल.

याच दिशेने शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार NCERT ची स्वतंत्र संस्था 'परख' (PARAKH) गेल्या काही काळापासून 'विविध शालेय मंडळांमधील समानता' या विषयावर काम करत आहे. वेगवेगळ्या बोर्डांच्या परीक्षा आणि मूल्यमापन पद्धतीत एकसूत्रता आणणे, हा यामागचा मुख्य हेतू आहे.

नंदन नीलेकणी समितीमध्ये कोणते सदस्य आहेत?

नंदन नीलेकणी हे इन्फोसिसचे सह-संस्थापक असून, ते आधार प्रकल्पाचे माजी अध्यक्ष आणि सध्याच्या परीक्षा सुधारणा समितीचे चेअरमन आहेत. त्यांच्या या उच्चस्तरीय समितीमध्ये पाच प्रमुख सदस्यांचा समावेश आहे:

  • एस. सोमनाथ (इसरोचे माजी अध्यक्ष)

  • तपन डेका (इंटेलिजेंस ब्युरोचे माजी संचालक)

  • प्रा. व्ही. कामकोटी (आयआयटी मद्रासचे संचालक)

  • अनिता करवाल (माजी शिक्षण सचिव)

  • अमृतलाल मीणा (लॉजिस्टिक्स तज्ज्ञ)

Q

नीट आणि जेईईच्या प्रवेश प्रक्रियेत बारावीच्या गुणांना पुन्हा महत्त्व दिले जाऊ शकते का?

A

होय, नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय टास्क फोर्सला मिळालेल्या ५४ हजारांहून अधिक सूचनांमध्ये प्रवेश परीक्षांसोबतच बारावीच्या गुणांना वेटेज देण्याची मागणी करण्यात आली आहे. विविध राज्य सरकारांनीही यासंदर्भात सूचना दिल्या असून, समिती या पर्यायावर विचार करत आहे.

Q

जेईई मेनमध्ये यापूर्वी बारावीच्या गुणांना किती वेटेज दिले जात होते आणि ते कधी बंद करण्यात आले?

A

सन २०१३ पासून जेईई मेनची अखिल भारतीय रँक निश्चित करताना बारावीच्या गुणांना ४० टक्के वेटेज दिले जात होते. वेगवेगळ्या शिक्षण मंडळांच्या निकालांमधील तफावत आणि रँक निश्चितीतील अडचणींमुळे प्राध्यापक अशोक मिश्रा समितीच्या शिफारशीनंतर २०१७ मध्ये हा नियम रद्द करण्यात आला होता.

Q

प्रवेश प्रक्रियेत बारावीच्या गुणांना वेटेज देण्यामागील मुख्य उद्दिष्ट काय आहे?

A

शालेय शिक्षणाचे महत्त्व टिकवून ठेवणे आणि विद्यार्थ्यांचे कोचिंग क्लासेसवरील अवलंबित्व कमी करणे, हा या प्रस्तावामागील मुख्य उद्देश मानला जात आहे.