फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळात अनेक लोक बक्कळ पैसे कमवण्याच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी अनेक गोष्टी करत असतात. मध्यम वर्गातील लोकं मुख्यता नोकरीच्या शोधत असतात. परंतु, प्रत्येकवेळी नोकरी आपल्याला हवे ते देईल असे सांगता येत नाही. त्यामुळे काही लोक नोकरीला सरस्व मानत नाहीत. मध्यम वर्गातील काही लोक इतकी जिद्दी असतात कि ते सुरुवातीच्या काळात नोकरी करतात त्यापासून महसूल गोळा करून स्वतःचा व्यवसाय सुरु करतात. यातील अनेक जणांना त्यांच्या प्रयत्नामध्ये यश मिळतो तर काही लोकांचा व्यावसायिक प्रवास फारकाळ टिकत नाही. या असफलतेच्या भीतीने अनेक लोकं व्यवसायात उतरायला घाबरतात आणि आयुष्यभर नोकरीच्या पर्यायायवर अवलंबून असतात.
हे देखील वाचा : ISRO मध्ये मिळणार हाय सॅलरी पॅकेज; १०वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी
काहीं लोकांचे असे म्हणणे असते कि नोकरी करून माणूस फक्त जीवन घालवतो त्याला नीट जगत नसतो. परंतु, तुम्ही या वाक्याला खोटे ठरवू शकता. जगात अशी अनेक लोकं आहेत, ज्यांनी या वाक्याला खोटे ठरवले आहे. त्यामागेही काही सिक्रेट्स आहेत. चला तर मग जाणून घेऊया अशा सिक्रेट्सबद्दल ज्याला अनुसरून तुम्ही नोकरीच्या मार्फतदेखील अपेक्षेपेक्षा जास्त कमवू शकता.
मुळात आताच्या नोकरदार वर्गाला गुंतवणुकीवर फार विश्वास आहे आणि तो असलाच पाहिजे. परंतु, करिअरच्या सुरुवातीच्या काळापासून केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर तर ठरेल पण तितकी नाही जितकं तुम्ही विचार करताय. जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीपासून अपेक्षेपेक्षाही जास्त कमवण्याचा विचार करत आहात तर गुंतवणूफोटो सौजन्य – Social Mediaक करण्याचे ठिकाण बदला. व्यक्तीने करिअरच्या सुरुवातीच्या काळात पैशांची गुंतवणूक बाजारात करण्यापेक्षा स्वतःचे कौशल्य वाढवण्यावर केले पाहिजे. स्वतःचे कौशल्य वाढवल्याने व्यक्तीला भविष्यात जास्त फायदा होतो. जास्त कौशल्य असल्याने आपल्या कडे पैसे कमवण्याचे माध्यम वाढतात.
हे देखील वाचा : Career Tips: ‘या’ सॉफ्ट स्किल्स करिअरमधील प्रगतीसह व्यक्तीमत्वाचाही होतो विकास!
जिथे एखादा व्यक्ती २५,००० कमवतो तेथेच कौशल्य असणारा व्यक्ती विविध पर्यायांच्या माध्यमातून तसेच त्याच्या कौशल्याच्या जोरावर तीन ते चारपट जास्त कमावतो. दर महिन्यातील २५,००० पगारातून २,००० रुपये बाजूला काढून बाजारात गुंतवल्यावर जितका रिटर्न्स मिळतो त्यापेक्षा जास्त आपले कौशल्य आपल्याला कमावून देते आणि आपल्या अपेक्षेपलीकडील स्वप्नांची पूर्तता करते.