फोटो सौजन्य - Social Media
जगामध्ये असे आणले कार्यक्रम होतात, जिथे व्यक्ती आपल्या कौशल्याच्या बळावर बक्कळ पैसे कमवू शकतात. अगदी लोक आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावरही कोटींच्या रक्कमेत पैसे कमवतात. समोरचा आपल्याला प्रश्न विचारणार आणि त्यावर आपण योग्य उत्तर देऊन कोटिनमची रक्कम आपल्या नाव करणार, अशा संधीला सुवर्णसंधी म्हंटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण आपल्या ज्ञानाच्या बळावर आपल्या विचारांच्या पलीकडील रक्कम आपल्याला मिळतेय तीही काही क्षणांच्या खेळात खेळ खेळून! जगभरात अशी संधी देणारे अनेक प्लॅटफॉर्म आहेत, जे काही खेळ आयोजित करतात, जेथे स्पर्धक आपल्या ज्ञानाच्या बळावर कोटींची धनराशी जिंकू शकतो. भारतात कौन बनेगा करोडपती नावाच्या कार्यक्रमाने अनेक भारतीयांना करोडपती बनवले आहे. येथे अनेक लोकांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर अवघ्या काही क्षणांच्या खेळात कोटींची धनराशी कमवली आहे.
हे सुद्धा वाचा : UPSC चे वर्ष २०२५ रिवाईज्ड कॅलेंडर जाहीर; जाणून घ्या परीक्षेच्या तारखा
कौन बनेगा करोडपती भारतातील लोकप्रिय रिऍलिटी शॉज पैकी एक आहे. भारतातील मोठी लोकसंख्या या कार्यक्रमाला आवर्जून पाहते. बहुतेक या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून जातात आणि ज्ञानाच्या बळावर कधी थोडे तर कधी विचारांच्या पलीकडीन रक्कम जिंकून सोबत घेऊन जातात. या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी आहे, भारतातील बहुतेक भाषांमध्ये या कार्यक्रमाची सुरुवात केली गेली आहे. सध्या कौन बनेगा करोडपतीचा सोळावे पर्व सुरु आहे. या पर्वाची होस्टिंग दरवेळीप्रमाणे बिग बी अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत.
नुकतेच या पर्वातील एक महत्वाची गोष्ट घडली आहे. राजस्थानमधील नरेशी मीना यंदाच्या पर्वातील एक स्पर्धक होती. विशेष म्हणजे कोटींच्यात घरातील प्रश्नावर पोहचणारी ती यंदाची पहिली स्पर्धक होती. तिला तब्बल एक कोटींचा प्रश्न विचारला गेला होता. परंतु, उत्तराची खात्री नसल्यामुळे तिने माघार घेतली आणि खेळ सोडला. जर तिने त्या प्रश्नाचे उत्तर दिले असते तर ती या पर्वातील कोटींची कमाई करणारी पहिली स्पर्धक ठरली असती. देशभरात सर्वत्र या प्रश्नांची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे UPSC तसेच MPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे असते. मुळात, नरेशी मीना यांना विचारला गेलेला प्रश्न स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा प्रश्न होता. नरेशी यांनी खेळ सोडल्यामुळे त्या ५० लाखांची धनराशीसहित खेळातून बाहेर पडल्या.
हे सुद्धा वाचा : पोलिस दलातील ११ हजार पदांची प्रक्रिया पूर्ण; सप्टेंबरमध्ये देणार प्रशिक्षण
लीला राव दयाल कोणाचा पराभव करून विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिपमध्ये एकेरी सामना जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली? असा प्रश्न नरेशी यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नासाठी त्यांना चार पर्याय दिले गेले होते. ए- लॉटी डॉड, बी- ल्गैडिस साउथवेल, सी- मे सेटन तसेच डी – किट्टी गॉडफ्री. नरेशी B आणि D यामध्ये कन्फ्युज होती. परंतु, खेळ सोडल्यावर तिला पुन्हा हा प्रश्न विचारले गेल्यावर तिने ए- लॉटी डॉड पर्याय निवडला जो चुकीचा ठरला.