फोटो सौजन्य - Social Media
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी (UIIC)ने भरतीची सुवर्णसंधी आणली होती. या भरतीच्या संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. २०० रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. एकंदरीत, या भरतीमध्ये अनेक उमेदवारांनी अर्ज करण्याची सुरुवात केली होती. अनेक उमेदवारांनी या भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता. अनेक उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करण्यास इच्छुक होते, परंतु काही कारणामुळे वेळेत अर्ज करता आले नाही.
हे देखील वाचा : विद्यार्थ्याने AI च्या मदतीने परीक्षेत उत्तरं दिलं म्हणून विद्यापीठाने केलं नापास; प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
अशा उमेदवारांनी एक बाब लक्षात घ्यावी, कि आज UIIC च्या या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. जर आपल्याकडून अर्ज करायचे राहून गेले असेल तर आज या संधीचा फायदा घेत, तुम्ही अर्ज करू शकता. आज अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे. Administrative Officers (AO) Scale-I च्या पदासाठी हि भरती आयोजित करण्यात आली होती.
१५ ऑक्टोबर २०२४ पासून या भरतीला सुरुवात झाली आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. आज शेवटची तारीख असल्याने उमेदवारांना आजच्या आज आपले अर्ज नोंदवायचे आहे आणि या भरतीसाठी स्वतःला सहभाग करून घ्यायचे आहे. UIIC च्या या भरतीमध्ये उमेदवारांना एक परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. ही परीक्षा डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येईल. डिसेंबरच्या १४ तारखेला ही परीक्षा आयोजित करण्यात येईल. या परीक्षेला पात्र ठरलेला उमेदवार नियुक्तीस पात्र ठरणार आहे.
या परीक्षेच्या अगोदर काही दिवसांपूर्वी उमेदवारांसाठी प्रवेश पत्र जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांना हे प्रवेश पत्र ४ डिसेंबर रोजी पाहता येणार आहे तसेच डाउनलोड करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात डाउनलोड करता येणार आहे. तसेच अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. सामान्य क्ष्रेणीतील उमेदवारांना ही अर्ज शुल्क म्हणून १००० रुपयांची भरपाई करायची आहे. OBS तसेच EWS आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनासुद्धा अर्ज शुल्क म्हणून १००० रुपये भरायचे आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना २५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे.
हे देखील वाचा : यूपी मदरसा कायदा हा कायदेशीर की बेकायदेशीर? काय दिला सुप्रीम कोर्टाने निर्णय?
PWD प्रवर्गातील उमेदवारांनादेखील २५० रुपयांची भरपाई करायची आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती अधिसूचनमध्ये नमूद आहेत. या अटी शर्ती उमेदवारांच्या शिक्षण तसेच वयोमर्यादे संदर्भात आहेत. किमान २१ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घ्यावा.