• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Maharashtra Secular Teachers Association Initiative

महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेचा उपक्रम! राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020’वर कार्यशाळा

महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघ (MUST) तर्फे ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020’वरील कार्यशाळा 12 डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 12, 2025 | 08:46 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कार्यशाळा 12 डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आयोजित
  • NEP 2020 चे परिणाम आणि आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत
  • शुक्रवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यक्रम पार पडणार
महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघ (MUST) तर्फे ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020’च्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा 12 डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आयोजित करण्यात आली आहे. गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील शिक्षक आणि विद्यार्थी नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीला सामोरे जात आहेत. या पार्श्वभूमीवर धोरणातील मुद्द्यांच्या सखोल आढाव्यासाठी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीतील अडचणी समजून घेण्यासाठी या कार्यशाळेचे महत्त्व अधिक वाढले आहे.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची महत्वाची घोषणा! कांदिवलीत Cisco–CII सेंटर फॉर एआय, नेटवर्किंग अँड आंत्रप्रेन्योरशिपची घोषणा

मुंबई विद्यापीठाने यापूर्वीही NEP संदर्भात अनेक कार्यशाळा आणि चर्चासत्रे घेतली आहेत. त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न झाला असला तरी धोरण राबविताना अनेक मुद्दे अद्याप अनुत्तरीत राहिले आहेत. शिक्षकांवर वाढलेले कामाचे ओझे, विद्यार्थ्यांची जादा संख्या, विषयांचे विभाजन, अभ्यासक्रमात आलेले नवीन विषय आणि बदल यांसारख्या अनेक आव्हानांना शिक्षकांना सामोरे जावे लागत आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 हा स्थिर दस्तऐवज नसून सतत बदलत राहणारा आणि काळानुसार नव्या आव्हानांना सामोरे जाणारा एक गतिशील आराखडा आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी ही एका दिवसाची किंवा एका वर्षाची प्रक्रिया नसून एक अविरत प्रवास आहे. या पार्श्वभूमीवर वेळोवेळी अशा कार्यशाळा आणि परिषदा आयोजित करणे गरजेचे असल्याचे संघटनेचे मत आहे.

नवीन शिक्षण धोरण सरकारी धोरणाचा भाग असल्यामुळे त्याची अंमलबजावणी करताना शिक्षक, विद्यार्थी आणि महाविद्यालयांना अनेक मर्यादांचा सामना करावा लागला आहे. हे लक्षात घेऊन MUST संघटनेने ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. कार्यशाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या समस्या, शैक्षणिक संरचनेतील बदल, तसेच भविष्यातील शिक्षणाच्या दिशा यावर चर्चा होणार आहे. संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पवार आणि सरचिटणीस डॉ. निर्मला पवार यांनी महाविद्यालयांतील जास्तीत जास्त प्राध्यापकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

शालेय सहलींच्या मागणीत वाढ! नोव्हेंबर महिन्यात २,२४३ बसेस करून देण्यात आले उपल्बध

या कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण म्हणजे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची उपस्थिती. ते ‘विद्यार्थी, शिक्षक आणि समाजासाठी NEP 2020 चे परिणाम आणि आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्यासोबतच मुंबई उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. रूपेश राऊत आणि कोकण विभागाचे सहसंचालक डॉ. किरणकुमार बॉदर देखील उपस्थित राहणार आहेत.
ही कार्यशाळा ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम, नॅनो सायन्स सेंटर, कलिना कॅम्पस येथे आयोजित करण्यात आली असून, शुक्रवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यक्रम पार पडणार आहे. शैक्षणिक व्यवस्थेतील बदल समजून घेण्यासाठी आणि NEP चा शैक्षणिक क्षेत्रावर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची संधी ठरणार आहे.

Web Title: Maharashtra secular teachers association initiative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 08:46 AM

Topics:  

  • Education Department

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेचा उपक्रम! राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020’वर कार्यशाळा

महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेचा उपक्रम! राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020’वर कार्यशाळा

Dec 12, 2025 | 08:46 AM
भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष

भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष

Dec 12, 2025 | 08:44 AM
Universal Health Coverage Day: आयुष्मान भारत! सरकारच्या ‘या’ फायदेशीर योजनांमुळे आरोग्य सेवेवरील खर्च होईल मोफत; वाचा कसे ते…

Universal Health Coverage Day: आयुष्मान भारत! सरकारच्या ‘या’ फायदेशीर योजनांमुळे आरोग्य सेवेवरील खर्च होईल मोफत; वाचा कसे ते…

Dec 12, 2025 | 08:30 AM
Todays Gold-Silver Price: चांदीने घेतली सर्वात मोठी झेप, पार केला 2 लाख रुपयांचा टप्पा! सोन्याचे दर जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: चांदीने घेतली सर्वात मोठी झेप, पार केला 2 लाख रुपयांचा टप्पा! सोन्याचे दर जाणून घ्या

Dec 12, 2025 | 08:30 AM
मुंबईत एएसयूएस आणि विद्या फाउंडेशनचा उपक्रम! शाळांमध्ये डिजिटल लर्निंग सेंटरची स्थापना

मुंबईत एएसयूएस आणि विद्या फाउंडेशनचा उपक्रम! शाळांमध्ये डिजिटल लर्निंग सेंटरची स्थापना

Dec 12, 2025 | 08:30 AM
WD WD WD WD WD WD…’सिंग भाऊ’ चाललयं काय? गौतम गंभीर संतापला, Video Viral

WD WD WD WD WD WD…’सिंग भाऊ’ चाललयं काय? गौतम गंभीर संतापला, Video Viral

Dec 12, 2025 | 08:30 AM
Shivraj Patil Chakurkar : देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन; 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Shivraj Patil Chakurkar : देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन; 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Dec 12, 2025 | 08:18 AM

व्हिडिओ

पुढे बघा
NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

NAGPUR : अधिवेशनातील उपस्थितीवरून आ. निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Dec 11, 2025 | 03:02 PM
‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Dec 11, 2025 | 02:59 PM
Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Alibaug : चित्रलेखा पाटलांचा भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब नंबर टू ; केले गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:55 PM
AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

AHILYANAGAR : काम संथ, त्रास अनंत, २० वर्षानंतरही नगर मनमाड महामार्ग अपूर्णच; प्रवाशांचा संताप

Dec 11, 2025 | 02:51 PM
गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी?  या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

गुजरातने महाराष्ट्रात केली घुसखोरी? या ग्रामपंचायतीने केला गंभीर आरोप

Dec 11, 2025 | 02:47 PM
ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

ई व्हेईकल धारकांसाठी आनंदाची बातमी; टोलची रक्कम परत मिळणार

Dec 10, 2025 | 03:07 PM
पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वे शिर्डीमार्गे नेण्याचा घाट? आ. डॉ. किरण लहामटेंचा तीव्र विरोध

Dec 10, 2025 | 03:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.