राज्यातील तब्बल 1650 खेड्यांत प्राथमिक शाळाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये शेजारच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले जात असल्याचे उत्तर शिक्षण विभागाच्या मुख्य सचिवांनी दिले.
महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावीच्या २०२६ च्या परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे.
भारतामध्ये सरकारी शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे. देशामध्ये हजारो अशा शाळा आहेत ज्यामध्ये केवळ शिक्षक फुकट पगार घेत आहेत. कारण तिथे एकही विद्यार्थी शिक्षण घेत नाही.
प्राध्यापक पदभरती १००% आणि सीएचबी मानधनवाढ याबद्दल शासन पात्रताधारकांची फसवणूक करित असून, २ वर्षापासून प्राध्यापक पदभरतीची घोषणा करतायत परंतू प्रत्यक्षात कृती ० आहे.
माध्यमिक शिक्षक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने याबाबत या प्रक्रियेच्या विलंबासाठी शिक्षण विभागाला जबाबदार धरले आहे. आधार प्रमाणीकरण आणि संचमान्यता प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे शाळांना त्रास होत आहे.
परिपत्रकात म्हटले आहे की, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व शिक्षकांनी ज्यांनी अद्याप टीईटी उत्तीर्ण केलेली नाही. त्यांनी पुढील दोन वर्षांत ती उत्तीर्ण करावी, अन्यथा सक्तीची निवृत्ती घ्यावी.
आता एसआयटी याची चौकशी करणार असल्याने उपसंचालक कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली आहे. अकरावी, बारावीमधील शिक्षकांची संबंधित ४५ ते ५० फाईल्स दिसत नसल्याची चर्चा विभागात आहे.
निकाल जाहीर झाल्यावर अनेक विद्यार्थ्यांसोबत हीच समस्या समोर आली. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे तक्रार केली. त्यानंतर प्राचार्यांनी २० व २७ मार्च रोजी विद्यापीठाला पत्र लिहिले.
गरीब पालकांवर विद्यार्थ्यांच्या कार्यालय नगर परिषद गोंदिया शिक्षणाचा बोजा पडू नये, यासाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशासह गणवेश, पाठ्यपुस्तक, जोडे-मोजे, पोषण आहार यासह अन्य शैक्षणिक साहित्य व सुविधा पुरवल्या जात आहेत.
अनेक जिल्ह्यात विस्तार अधिकारी व इतर अधिकारीही सामूहिक रजेवर गेले आहेत. यामुळे शालेय शिक्षण व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता असून, संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
पुणे जिल्ह्यातील ७४ शाळांना ‘शून्य शिक्षक’ पदांमुळे शाळा चालवणे अशक्य झाले असून विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. यामुळेच शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त करत, शासनाच्या दिरंगाईविरोधात आवाज उठवला.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नाने महापालिका शाळांमध्ये आयटीआयच्या निवडक ट्रेड्सचे अभ्यासक्रम सुरु असल्याची माहितीही यावेळी शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.
विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये असलेल्या अनेक पदव्यूत्तर महाविद्यालयांमध्ये आवश्यक त्या मुलभूत सुविधा, शैक्षणिक मनुष्यबळ आणि संशोधनासाठी योग्य वातावरणाचा अभाव आहे
26 ते 29 मे दरम्यान विभागस्तरीय व जिल्हास्तरीय टीओटी होणार आहे. त्यानंतर या प्रशिक्षणात तयार झालेले तज्ञ मार्गदर्शक 2 जून ते 12 जून या कालावधीत तालुकास्तरीय शिक्षकांना ऑफलाईन प्रशिक्षण देतील.
राज्यातील उच्च माध्यमिक बोर्डाकडून 11 वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ उडाला आहे. 11 वी प्रवेशाची वेबसाईट 4 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे ११च्या प्रवेशाची आतुरतेने वाट पाहणारे विद्यार्थी काळजीत पडले…