आजच्या काळात पदवी शिक्षणानंतर घेतलेल्या शिक्षणाला फार महत्व आहे. त्यामुळेच पदवीनंतर MBA किंवा PGDM केले जाते. या व्यवस्थापन अभ्यासक्रमांना दरवर्षी मोठ्यासंख्येने विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र एमबीए आणि पीजीडीएम यामध्ये फरक असतो. हे दोन्ही अभ्यासक्रम भिन्न आहेत. दोन्ही अभ्यासक्रमासाठी लागणारी फी ही भिन्न आहे. तसेच कोर्स पूर्ण झाल्यानंतर मिळणारा पगार आणि जॉब प्लेसमेंट यातही मोठा फरक असतो. जाणून घेऊया याबद्दल
MBA म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि PGDM म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट. या फुल फॉर्मवरुनच एमबीए आणि पीजीडीएममधला फरक कळतो. एमबीए हा पदवी अभ्यासक्रम आहे, तर पीजीडीएम हा एक डिप्लोमा अभ्यासक्रम आहे हा त्यातील प्राथमिक फरक आहे. एमबीए आणि पीजीडीएम अभ्यासक्रमांमध्ये काही प्रमाणात समानता आहे, दोन्ही अभ्यासक्रम हे व्यवस्थापन क्षेत्राशी निगडीत आहेत. एक पदव्युत्तर पदवी तर दुसरा डिप्लोमा अभ्यासक्रम असले तरी त्यातील फरक हे जाणून घेणे आवश्यक आहे.
एमबीए अभ्यासक्रम: एमबीए (मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन)
एमबीए हा पदवी अभ्यासक्रम आहे. हा बहुतांश 2 वर्षाकरिता असतो. एमबीए अभ्यासक्रमामध्ये सर्वसमावेशक व्यवस्थापन शिक्षणाचा समावेश आहे. एमबीएमध्ये व्यवस्थापन आणि नेतृत्वाचे विविध पैलू उलगडले जातात. यामध्ये प्रबंध/प्रकल्पाच्या कामाला खूप महत्त्व दिले जाते. एमबीएमध्ये अनेक पर्यायही उपलब्ध आहे. एमबीएच्या शेवटच्या सेमिस्टरमध्ये तुम्ही एमबीए इन फायनान्स, एमबीए इन मार्केटिंग, एमबीए इन एचआर असे पर्याय निवडू शकता. हा अभ्यासक्रम भारतातील उच्च शिक्षण संस्थांद्वारे मान्यताप्राप्त आहे.
PGDM कोर्स: पीजीडीएम (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट)
PGDM हा व्यवस्थापनाचा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे. PGDM अभ्यासक्रमाचा कालावधी हा साधारणपणे 1 किंवा 2 वर्षांचा असतो. पीजीडीएममध्ये व्यवस्थापनाच्या विशिष्ट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाते. यामध्ये प्रबंध किंवा प्रकल्प कार्याला फारसे महत्त्व दिले जात नाही. मात्र MBA प्रमाणे, PGDM मध्ये देखील विद्यार्थ्यांना स्पेशलायझेशनचे पर्याय दिले जातात (जसे वित्त, विपणन, HR). तुम्ही भारतामध्ये मोठ्या विद्यापीठे आणि व्यावसायिक संस्थांच्या पीजीडीएम कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता.
एमबीए आणि पीजीडीएममध्ये काय फरक आहे?
1. पदवी आणि डिप्लोमा: सर्वात पहिला फरक हा एमबीए हा पदवी अभ्यासक्रम आहे, तर पीजीडीएम हा डिप्लोमा अभ्यासक्रम आहे.
2. कोर्सचा कालावधी: MBA हा साधारणपणे 2 वर्षांचा कोर्स आहे, तर PGDM हा 1 किंवा 2 वर्षांचा कोर्स असतो.
3. व्यवस्थापन अभ्यासक्रम : एमबीए व्यापक व्यवस्थापन शिक्षण प्रदान करते, तर पीजीडीएम विशिष्ट व्यवस्थापन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करते.
4. मान्यता: MBA ला विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे मान्यता दिली जाते, तर PGDM अभ्यासक्रम व्यावसायिक संस्था आणि विद्यापीठांद्वारे ऑफर केला जातो.
5.स्पेशलायझेशन: एमबीए विविध स्पेशलायझेशन पर्याय ऑफर करते, जसे की फायनान्स, मार्केटिंग, एचआर, तर पीजीडीएममध्ये मध्येही स्पेशलायझेशन पर्याय आहेत.
6. प्रबंध/प्रकल्प कार्य: एमबीएमध्ये प्रबंध/प्रकल्प कार्य आवश्यक आहे, तर PGDM मध्ये प्रक्लप प्रबंध अनिवार्य केले जात नाही.
7. प्रवेशाचे निकष: MBA मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे आवश्यक आहेत, तर PGDM मध्ये प्रवेशाचे निकष वैयक्तिक संस्थेवर अवलंबून असतात.
8. फी: MBA ची फी सामान्यतः PGDM फी पेक्षा जास्त असते. खासगी विद्यापीठातील एमबीएची फी ही फार जास्त असू शकते.
9. करिअरच्या संधी: एमबीएनंतर करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात. तर पीजीडीएम विशिष्ट उद्योग किंवा क्षेत्रांमध्ये करिअरच्या संधी प्रदान करते. एमबीए उत्तीर्णांना पीजीडीएम उमेदवारांपेक्षा जास्त पगार मिळतो. एमबीएमध्ये कॅम्पस जॉब प्लेसमेंट दिले जातात.
10. जागतिक ओळख: MBA ला जागतिक स्तरावर मान्यता आहे, तर PGDM ची मर्यादित ओळख असू शकते.