
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
जागतिक गेमिंग उद्योगामध्ये भारताच्या स्थानाला नव्या उंचीवर नेण्यास सज्ज असलेल्या मोठ्या विकासासह डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड (डीपीआयआयटी)ने भारतातील सर्वात मोठा सोशल गेमिंग व परस्परसंवादी मनोरंजन प्लॅटफॉर्म विन्झोसोबत धोरणात्मक सहयोग केला आहे. या दोन वर्षांच्या सामंजस्य कराराचा (एमओयू) नाविन्यतेला चालना देत, कुशल टॅलेंट घडवत आणि जागतिक मंचावर स्पर्धा करण्यास स्टार्टअप्सना सक्षम करत भारतातील परस्परसंवादी मनोरंजन क्षेत्राच्या विकासाला गती देण्याचा मनसुबा आहे.
हा सहयोग २,००० हून अधिक स्टार्टअप्स, इनोव्हेटर्स व विद्यार्थ्यांची प्रबळ इकोसिस्टम निर्माण करण्यावर, तसेच त्यांना मार्गदर्शन, उद्योगाबाबत माहिती आणि जागतिक संधी देण्यावर लक्ष केंद्रित करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेमिंग व तंत्रज्ञानामधील आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनाशी संलग्न राहत हा उपक्रम भारताला परस्परसंवादी मनोरंजनामधील जागतिक लीडर म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, जो ३०० बिलियन डॉलर्स जागतिक गेमिंग बाजारपेठेचा बहुतांश शेअर कॅप्चर करेल.
सेंटर ऑफ एक्सलन्स
या सहयोगाची वैशिष्ट्य म्हणजे डीपीआयआयटीसोबत सहयोगाने विन्झोकडून स्थापना करण्यात येणारे सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई). सीओई स्टार्टअप्स व उद्योजकांसाठी लाँचपॅड म्हणून सेवा देईल, जेथे कुशल, उद्योग-सुसज्ज कर्मचारीवर्ग घडवणे, भारतीय गेमिंग मालमत्तांसाठी मॉनेटायझेशन धोरणांमध्ये नाविन्यता आणणे, जागतिक दर्जाच्या बाजारपेठांसाठी ‘मेड इन इंडिया’ बौद्धिक मालमत्ता विकसित करणे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट (एफडीआय) आकर्षित करणे आणि भारतात परस्परसंवादी तंत्रज्ञान उत्पादनांच्या उत्पादनाला गती देणे अशा महत्त्वपूर्ण पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यात येईल. मॉनेटायझेशन व टॅलेंटमधील तफावत अशा दीर्घकालीन आव्हानांचे निराकरण करत सीओई भारतातील गेमिंग व परस्परंसवादी मनोरंजन क्षेत्राच्या भविष्याला नवीन आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.
२ दशलक्षहून अधिक रोजगार निर्माण
अलिकडील यूएसआयएसपीएफ अहवालानुसार, भारतातील परस्परसंवादी मनोरंजन क्षेत्र २०३४ पर्यंत ६० बिलियन डॉलर्सपर्यंत विकसित होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे २ दशलक्षहून अधिक रोजगार निर्माण होतील. डीपीआयआयटी-विन्झो सहयोग स्टार्टअप्सना हॅकेथॉन्स, वर्कशॉप्स,अॅक्सेलेरेटर प्रोग्राम्स आणि क्यूरेटेड पिच इव्हेण्ट्सच्या माध्यमातून निपुण करत या क्षमतेचा फायदा घेण्यासाठी करण्यात आला आहे.तसेच, हा सामंजस्य करार विन्झोचा भारतातील टॉप गेम डेव्हलपर्सना ओळखण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख प्लॅटफॉर्म टेक ट्रायम्फ प्रोग्राम (भारत एडिशन)चा विस्तार करेल.
डीपीआयआयटीचे सहसचिव श्री. संजीव सिंग म्हणाले, “हा सहयोग उत्पादक व निर्यातदार म्हणून भारताच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यामधील मोठा टप्पा आहे. विन्झोसोबत सहयोगाच्या माध्यमातून आमचा नाविन्यतेला चालना देण्याचा, उद्योजकतेचा प्रसार करण्याचा आणि स्टार्टअप्सना जागतिक दर्जाची उत्पादने उत्पादित करण्यास सक्षम करण्याचा मनसुबा आहे.
डीपीआयआयटीचे संचालक (सटार्टअप इंडिया) डॉ. सुमीत कुमार जारंगल म्हणाले, “या उपक्रमामधून उद्योग सहयोगींसोबत सहयोग करत उद्योजकांसाठी प्रगतीशील इकोसिस्टम निर्माण करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. संसाधने, मार्गदर्शन व जागतिक एक्स्पोजर देत आम्ही स्टार्टअप्स निर्माण करण्यासोबत टॅलेंट व इनोव्हेशनची पाइपलाइन देखील तयार करत आहोत, जी भारताला जागतिक गेमिंग उद्योगामध्ये अग्रस्थानी घेऊन जाईल.’’
विन्झोच्या सह-संस्थापक सौम्या सिंग राठोड म्हणाल्या, ” हा सहयोग आमच्या सारख्या उद्योजकांना भारतातून जागतिक स्तरावर जाण्याचे स्वप्न पाहण्यास, घडवण्यास आणि मोठ्या प्रमाणात प्रगती करण्यास सक्षम करण्यामध्ये आधारस्तंभ आहे. हे सामंजस्य करार इकोसिस्टम निर्माण करण्याच्या दिशेने परिवर्तनात्मक पाऊल आहे, जी भारतासाठी इनोव्हेशनला चालना देईल, तसेच भारतीय उत्पादने व बौद्धिक मालमत्तेला जागतिक मंचावर देखील घेऊन जाईल. स्टार्टअप महाकुंभदरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनामधून प्रेरणा घेत आम्ही भारताला गेमिंग व तंत्रज्ञान इनोव्हेशनमध्ये जागतिक लीडर बनवण्याच्या आमच्या संकल्पाशी कटिबद्ध आहोत.’’