फोटो सौजन्य- सोशल मीडिया
MPSC Recruitment 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत आणि भाषा संचालनालयांतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
उप वैद्यकीय अधीक्षक (गट-ब) पदभरती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत उपनगरीय रुग्णालयांमध्ये ‘उप वैद्यकीय अधीक्षक (गट-ब)’ या संवर्गातील एकूण २ रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी आणि रुग्णालय प्रशासनातील पदव्युत्तर पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. तसेच, प्रशासकीय कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी असणे बंधनकारक आहे.
सहायक भाषा संचालक (अनुवाद व शब्दावली) पदभरती भाषा संचालनालयाच्या आस्थापनेवरील ‘सहायक भाषा संचालक, गट-ब’ या संवर्गातील २ रिक्त पदांसाठी देखील अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पदासाठी उमेदवाराकडे मराठी विषयात किमान द्वितीय श्रेणीतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, इंग्रजी विषयाचे ज्ञान आणि संस्कृत विषयाची अर्हता असणे आवश्यक आहे. याशिवाय, शासकीय किंवा मान्यताप्राप्त संस्थांमधील प्रशासनिक भाषांतर किंवा शब्दावली निर्मितीचा किमान ३ ते ५ वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
अर्ज करण्याचा कालावधी: दिनांक ०९ सप्टेंबर, २०२६ (दुपारी १४.०० वाजल्यापासून) ते दिनांक २९ सप्टेंबर, २०२६ (रात्री २३.५९ वाजेपर्यंत).
परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख: दिनांक ०२ ऑक्टोबर, २०२६ (रात्री २३.५९ वाजेपर्यंत).
अर्ज करण्याचे संकेतस्थळ: [https://mpsconline.gov.in](https://mpsconline.gov.in) किंवा [https://mpsc.gov.in](https://mpsc.gov.in).
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची सवलत बंद करण्यात आली असून उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा युपीआयद्वारे) शुल्क भरणे आवश्यक आहे. या पदभरती प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, आरक्षण आणि अटी-शर्ती MPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.






