फोटो सौजन्य - Social Media
भारतात बहुतेक लोकांना बाहेर देशात जाऊन कमवण्याची फार इच्छा असते. कारण बाहेर देशात मिळणार पॅकेज हा कधीही भारतामध्ये नोकरी करून मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त असतो. त्यामुळे वर्षाला अनेक भारतीय देश सोडून कामाच्या निमित्ताने बाहेरच्या देशात जातात. या संख्येत इतकी वाढ होत चालली आहे कि काही भारतीय भाषांनी इतर देशांमध्ये कहरच केला आहे. कॅनडाला दुसरा पंजाब बोललं तरी वावगं ठरणार नाही. कॅनडा देशात पंजाबी बोलणाऱ्या लोकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत चालली आहे. एकंदरीत, भारतातील तरुण कामासाठी इतर देशांकडे जास्त आकर्षित होत चालले आहेत. यादरम्यान अशा युवकांमध्ये एक काम चांगलेच चर्चेला आले आहे.
हे देखील वाचा : ७ तास काम करून कमवा २८,००० वेतन; टेस्लामध्ये कामाच्या संधी
सोशल मीडियावर सर्वत्र या भरतीची चर्चा सुरु आहे. मात्र या भरती प्रक्रियेत फक्त एका उमेदवारालाच नियुक्त केले जाणार आहे. या कामामध्ये त्या उमेदवाराला वर्षाला चक्क ३० कोटींचा पॅकेज मिळणार आहे. ३० कोटींचा पॅकेज ऐकून नक्कीच सगळयांना वाटले असेल कि काम ही तितकेच कठीण असेल. तर नियुक्त उमेदवाराला फक्त एकच काम असेल, लाईटचा स्विच ऑन करणे आणि ऑफ करणे, यापलीकडे काहीच काम नाही. उमेदवार कधीही झोपू शकतो, कधीही उठू शकतो. जीवनाची मजा करून वर्षाला ३० कोटी कमवू शकतो. हे ऐकून बहुतेक जणांच्या मनात आशेचा किरण जागा झाला असेल कि,’आहेत अजून काही नोकऱ्या, ज्या चांगला पगार देतात.’ तुम्हाला हे काम सोपे वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात.
हे काम तुम्हाला समुद्राच्या मधोमध एका लाईटहॉउसमध्ये करायचे आहे. या लाईटहॉउसमध्ये फक्त नि फक्त तुम्हीच असणार. तुमच्या व्यतिरिक्त इथे कुणीच नसणार. तुमच्या चारी बाजूला नजर जाईल तिथपर्यंत फक्त समुद्र असेल. तुम्हाला अनेक तुफानांचा सामना करावा लागेल. हे लाईटहॉउस इजिप्त येथील समुद्राच्या दरम्यान आहे. असं सांगितलं जात कि, तुफानादरम्यान अनेकदा हे लाईटहाऊस विशाल लाटांच्या खाली जाते. त्यामुळे येथे राहत असणाऱ्या करोडपती कर्मचाऱ्याच्या जीवाला दिवसाचे २४ तास धोका असतो. त्यामुळे जरी या कामाचे वर्षाला ३० कोटी मिळत असतील तरी कुणी हे आरामदायी काम करण्यास तयार होत नाही.