
फोटो सौजन्य - Social Media
NiviCap ची विशेषता म्हणजे भारतीय आणि ऑस्ट्रेलियन बाजाराची एकत्रित समज. ZIKSU या ऑस्ट्रेलियातील फिनटेक कंपनीचे संस्थापक या प्लॅटफॉर्मला तांत्रिक आणि आर्थिक बळ देतात, तर भारतातील विद्यार्थ्यांच्या समस्यांची जाण ठेवून हा अॅप दोन्ही देशांमधील अंतर कमी करतो. NiviCap फक्त कर्ज देणारा प्लॅटफॉर्म नाही, तर विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी एक संपूर्ण सहाय्य प्रणाली म्हणून काम करतो. कुटुंबांना भारतातून पैसे पाठवण्याची किंवा विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात पोहोचल्यावर तातडीच्या मदतीची आवश्यकता असेल, तर NiviCap त्या सेवा देखील पुरवतो. एअरपोर्ट पिकअपपासून ते नव्या देशात सेट होण्यासाठीची प्राथमिक मदत—सगळे काही एका अॅपमधून उपलब्ध आहे. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल असल्यामुळे विद्यार्थी कागदपत्रांमध्ये गुंतून न राहता त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतात, तर पालकांची चिंता देखील कमी होते.
या प्लॅटफॉर्मला अधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लॅन्गर यांची NiviCap च्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सहभागामुळे विश्वसनीयता, मार्गदर्शन आणि सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होते. NiviCap चे संस्थापक कार्तिक श्रीनिवासन यांनी सांगितले की, “माझा जन्म भारतात आणि वाढ ऑस्ट्रेलियात झाली असल्यामुळे मला भारतीय विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी चांगल्या प्रकारे माहिती आहेत. आज जवळपास 5.2 लाख भारतीय विद्यार्थी ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त करतात, परंतु केवळ 1.6 लाख विद्यार्थी प्रत्यक्ष प्रवेश घेतात. यामागील मुख्य कारण म्हणजे आर्थिक प्रक्रिया गुंतागुंतीची, विस्कळीत आणि अनेकांना योग्य माहिती नसणे. जवळपास 80% विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी कर्जावर अवलंबून असतात, पण कुटुंबांना दस्तऐवज, नियम आणि दोन देशांतील बँकिंग व्यवहार या सर्वांचा मोठा ताण येतो.” भारत आणि ऑस्ट्रेलियातील बँकिंग क्षेत्रात काम करताना या सर्व गोष्टी जवळून पाहिल्यामुळेच NiviCap ची कल्पना जन्माला आली.
त्यांच्या मते NiviCap हे फक्त कर्ज देणारे प्लॅटफॉर्म नसून विद्यार्थ्यांसाठी एक “Fast. Fair. Family Approved.” म्हणजेच वेगवान, पारदर्शक आणि कुटुंबाच्या विश्वासाला उतरलेली संपूर्ण आर्थिक सहाय्य प्रणाली आहे. ऑस्ट्रेलियात शिक्षणाची वाढती संधी आणि त्यासाठी लागणाऱ्या कर्ज प्रक्रियेचा सुलभ मार्ग आता भारतीय विद्यार्थ्यांसाठी अधिक सोपा झाला आहे, आणि त्याचे सर्व श्रेय NiviCap सारख्या आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मला जाते.