फोटो सौजन्य - Social Media
आर्मी वेल्फेअर एजुकेशन सोसायटी (AWES) लवकरच शिक्षक भरती संबंधित अधिसूचना जाहीर करण्याच्या मार्गावर आहे. या भरती प्रक्रियेमध्ये टीजीटी, पीजीटी तसेच पीआरटी पदांचा विचार केला जाईल. या भरती संबंधित अधिसूचना अद्याप जाहीर केले गेली नाही आहे. परंतु, या संदर्भातील अधिसूचना ९ सप्टेंबर या तारखेला प्रदर्शित होण्याची संभाव्यता आहे. त्यामुळे आर्मी स्कुलमध्ये शिक्षण पदी बसण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांनी या संधीचे सोने करावे अशी आशा आहे. उमेदवारांनी या AWES च्या अधिकृत संकेतस्थळावर नियमित लक्ष ठेवावे, जेणेकरून अधिसूचना जाहीर होताच लगेच अर्ज प्रक्रियेला सुरुवात करता येईल. अद्याप शिक्षक भरतीतील टीजीटी, पीजीटी तसेच पीआरटी पदांसाठी रिक्त असलेल्या जागांची संख्या जाहीर झालेली नाही आहे.
AWES 2024 साठी अर्ज प्रक्रियेला ९ सप्टेंबर २०२४ ला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑक्टोबरच्या २५ तारखेपर्यंत अर्ज करता येईल असे सांगण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात AWES काही अटीशर्ती जाहीर करण्याची संभाव्यता आहे. या अटीशर्ती मुख्यता वयोमर्यादा तसेच शैक्षणिक पात्रतेविषयी आहे. या अटी शर्तीना पात्र उमेदवारांनाच अर्ज प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. एकंदरीत, विविध पदांसाठी शिक्षणासंबंधित अटी वेगेवगेळ्या आहेत. पीआरटी पदासाठी उमेदवार बी.एड/ डी.एड/ जेबीटी प्रोग्राममध्ये पदवीधर असणे अनिवार्य आहे. तसेच टीजीटी पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी बी.एड प्रोग्राममध्ये किमान ५०% गुणांनी पदवीधर असणे अनिवार्य आहे. तसेच पीजीटी पदासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी बी एड तसेच पदवीयुत्तर असणे अनिवार्य आहे.
निवड प्रक्रियेमध्ये उमेदवाराची लिखित परीक्षा घेतली जाईल. त्या गुणांच्या अनुषंगाने उमेदवारांची निवड केली जाईल.
अशा प्रकारे करता येईल AWES 2024 अर्ज प्रक्रिया