नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज UGC NET (विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा) जूनच्या पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.NTA ने UGC NET 2024 जून परीक्षेचा निकाल ugcnet.nta.ac.in, ugcnet.ntaonline.in आणि nta.ac.in या तीन वेबसाइटवर उपलब्ध करून दिला आहे. ही परीक्षा असिस्टंट प्रोफेसरशिप, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) साठी परीक्षा घेण्यात आली होती. जूनमधील परीक्षा ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये घेण्यात आल्या होत्या.
UGC NET जून 2024 चे निकाल तपासण्यासाठी या पायऱ्या फॉलो करा:
NTA च्या वेबसाइटला भेट द्या: ugcnet.nta.ac.in. (ugcnet.ntaonline.in आणि nta.ac.in वर देखील तपासू शकता)
तुम्ही वेबसाइट उघडताच, तुम्हाला UGC NET जून स्कोअरकार्ड तपासण्याचा आणि डाउनलोड करण्याचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करा.
आता, तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
त्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. तुम्ही क्लिक करताच तुमचे स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल.
तुमच्या पुढील वापरासाठी UGC NET जून स्कोअरकार्ड डाउनलोड करा.
येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की यूजीसी नेट जून परीक्षा, जी चाचणीच्या अखंडतेच्या चिंतेमुळे सुरुवातीला रद्द करण्यात आली होती, ती 21 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2024 दरम्यान घेण्यात आली होती,
UGC NET जून 2024 मार्किंग स्कीमनुसार, प्रत्येक प्रश्नाला दोन गुण होते आणि चुकीच्या उत्तरांसाठी कोणतेही नकारात्मक गुण कमी करण्यात येणार नव्हते.
या तारखांना पार पडली परीक्षा
UGC NET जूनची पुनर्परीक्षा ही ऑगस्ट 21, 22, 23, 27, 28, 29, 30 आणि सप्टेंबर 2, 3, 4 आणि 5 या तारखांना पार पडली. ही परीक्षा संगणकावर आधारित चाचणी (CBT) स्वरुपात घेण्यात आली. परीक्षेनंतर, NTA ने दोन टप्प्यांत तात्पुरती उत्तर पत्रिका जारी केली, आणि यासंबंधी उमेदवारांना 14 सप्टेंबर 2024 पूर्वी आक्षेप सादर करून उत्तरांना आव्हान देण्याची संधी होती. 12 ऑक्टोबर 2024 रोजी, NTA ने अंतिम उत्तर पत्रिका प्रकाशित केली, त्याआधारे यूजीसी नेट जून 2024 चा निकाल लावण्यात आला आहे.
अधिक माहिती आणि अपडेटसाठी उमेदवारांना UGC NET 2024 च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा सल्ला दिला जातो. विषय-निहाय आणि श्रेणी-निहाय कट-ऑफ सूची आता डाउनलोडसाठी उपलब्ध आहे आणि उमेदवार भविष्यातील UGC NET परीक्षांच्या तयारीदरम्यान संदर्भासाठी हा डेटा वापरू शकतात.