फोटो सौजन्य- iStock
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) UGC NET ही परीक्षा डिसेंबर 2024 सत्रासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. या अर्जप्रक्रियेसाठी शेवटची तारीख ही 10 डिसेंबर 2024 आहे. तसेच 11 डिसेंबर 2024 पर्यंत परीक्षार्थी फी भरु शकणार आहेत.
युजीसी नेट (UGC NET) डिसेंबर 2024: अर्ज शुल्क
महत्त्वाच्या तारखा:
युजीसी नेट (UGC NET) डिसेंबर 2024 परीक्षा तारखा
अधिकृत सूचनेनुसार, UGC NET डिसेंबर 2024 सत्राच्या परीक्षा 1 जानेवारी 2025 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीत घेतल्या जातील. उमेदवारांना त्यांच्या परीक्षेचे शहर कधी जाहीर केले जाईल, याची माहिती नंतर दिली जाईल. तसेच, प्रवेशपत्रे (ज्यात परीक्षा केंद्र आणि वेळ याचा समावेश असेल) परीक्षेपूर्वी अधिकृत वेबसाइटवर जारी केली जातील.
UGC NET डिसेंबर 2024 साठी अर्ज कसा कराय चा
1: अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in ला भेट द्या.
2: मुख्यपृष्ठावर “UGC-NET December-2024: Click Here to Register/Login” या लिंकवर क्लिक करा.
3: नवीन पृष्ठ उघडल्यावर, “New Registration for UGC NET December 2024” लिंक निवडा.
4: नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक तपशील भरा.
5: नोंदणी झाल्यानंतर, सिस्टमद्वारे तयार केलेला नोंदणी आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
6: UGC NET डिसेंबर 2024 अर्ज फॉर्म भरा आणि शुल्क भरा.
7: अर्ज सादर करा आणि भविष्यासाठी त्याची प्रत सुरक्षित ठेवा.
UGC NET युजीसी नेट परीक्षा आणि स्वरुप
UGC NET (University Grants Commission National Eligibility Test) ही भारतातील एक प्रतिष्ठित राष्ट्रीय परीक्षा आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सहायक प्राध्यापक पदासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी ही परीक्षा आयोजित केली जाते. तसेच, JRF (Junior Research Fellowship) पात्रता मिळवण्यासाठीही ही परीक्षा दिली जाते.
NTA (National Testing Agency) मार्फत वर्षातून दोनदा UGC NET परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा संगणक आधारित (CBT) स्वरूपात आयोजित होते आणि यामध्ये 81 विषयांचा समावेश असतो. परीक्षेचे स्वरूप दोन भागांत विभागलेले आहे:
पेपर 1: सामान्य शिक्षण, संशोधन व अध्यापन कौशल्य, तर्कशक्ती, व डेटा विश्लेषण यावर आधारित प्रश्न असतात.
पेपर 2: उमेदवाराच्या निवडलेल्या विषयाशी संबंधित असतो.
उमेदवारांना JRF किंवा सहायक प्राध्यापक पात्रता मिळवण्यासाठी किमान ठरावीक गुण आवश्यक आहेत. JRF पात्रता मिळाल्यास संशोधनासाठी शिष्यवृत्ती देखील दिली जाते, ज्यामुळे उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील संधी अधिक वाढतात.UGC NET परीक्षा शिक्षण, अध्यापन, आणि संशोधन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.