फोटो सौजन्य - Social Media
कॅनडामध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. PGWP म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन वर्क परमिटचे नवे नियम लागू करण्यात आले आहे. १ नोव्हेंबर पासून या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.PGWP मध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आली आहे. कॅनडामध्ये शिकहसन घेतल्यावर विदेशी विद्यार्थ्यांना देशात काम करण्यासाठी वर्क परमिट जाहीर केला जातो. इमिग्रेशन, रेफ्यूजीज एंड सिटिजनशिप कॅनडा (IRCC)च्या माध्यमातून केले गेलेल्या बदलांच्या माध्यमातून PGWP मध्ये काही नियम बदलले गेले आहेत.
हे देखील वाचा : UIIC मध्ये भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख; आजच करा अर्ज, अन्यथा संधीला मुकाल
PGWP मध्ये काही पात्रता मानदंड अधिसारखेच आहेत. त्यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहे. तेथील बाजार आणि गरजेनुसार हे नियम बदलण्यात आले आहेत. मुळात, नव्या नियमामध्ये सर्वात जास्त जोर भाषेवर दिला जात आहे. चला तर मग जाणून घेऊयात, PGWP मध्ये काय बदल करण्यात आले आहेत?
भाषे संबंधित काय बदल करण्यात आले आहेत?
कॅनडा मध्ये PGWP साठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना भाषेवर पकड असणे महत्वाचे आहे. आपण ज्या कामासाठी काम करत आहोत, त्यामध्ये भाषेवर पकड असणे अनिवार्य आहे. ती पकड ओळखता, हा नियम लागू करण्यात आला आहे. इंग्रजी किंवा फ्रेंच भाषेत उमेदवार हुशार असावा. उमेदवाराला अस्खलित इंग्रजी किंवा फ्रेंच भाषा येत असावी. त्या संबंधित प्रमाणपत्र ही उमेदवाराकडे असणे अनिवार्य आहे. इंग्रजी भाषेमध्ये प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी उमेदवारांकडे CELPIP, IELTS किंवा PTE मध्ये उत्तम गुण असणे अनिवार्य आहे. तसेच फ्रेंच भाषेमध्ये प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी उमेदवारांकडे IRCC TEF Canada, TCF Canada किंवा NCLC मध्ये उत्तम गुण असणे अनिवार्य आहे.
कॅनडामध्ये काही क्षेत्रांमध्ये मानवीबळाची गरज भासत आहे. ती गरज लक्षात घेता, कॅनडा सरकारने मनुष्य बळ वाढवण्यासाठी PGWP मध्ये बदल केले आहे. या बदलाच्या मुळे, काही ठराविक क्षेत्रातील उमेदवारांना PGWP प्राप्त करणे अधिक सुलभ होणार आहे. अनेक गोष्टींमध्ये जरी बदल केले गेले असले तरी काही महत्वाच्या गोष्टींमध्ये बदल करण्यात आला नाही आहे. जर तुम्ही कॅनडामध्ये शिकण्यास किंवा काम करण्याच्या हेतूने जात आहात तर या गोष्टींचा जरूर अभ्यास करा.
हे देखील वाचा : विद्यार्थ्याने AI च्या मदतीने परीक्षेत उत्तरं दिलं म्हणून विद्यापीठाने केलं नापास; प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
जर कुण्या विद्यार्थ्यांचे PGWP परमिट अर्ज करण्याच्या अगोदर संपत आहे तर IRCC त्याला विद्यार्थी स्टेट्स टिकवून ठेवण्यासाठी ९० दिवसांचा कालावधी देते. या दरम्यान उमेदवारांना PGWP साठी अर्ज करावे लागणार आहे. तसेच शुल्क भरावे लागणार आहे. जो पर्यंत उमेदवारांना त्यांचा वर्क परमिट आणि स्टडी परमिट मिळत नाही तो पर्यंत त्यांना काम करता येणार आहे.