career (फोटो सौजन्य: social media)
भारत सरकारने पंतप्रधान इंटर्नशिप योजणार सुरु केली. या योजनेचा मुख्य उद्देश पुढील ५ वर्षात देशातील १ कोटी तरुणानं ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे आहे. या योजनेद्वारे तरुणांना देशातील विविध ५०० सरकारी आणि खाजगी कंपन्यांमध्ये १२ महिने इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाणार. ज्यामध्ये देशातील सर्वोत्तम कंपन्यांपैकी एका कंपनीमध्ये नवीन कौशल्ये शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळू शकेल. ही योजना २०२४ मध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आली होती आणि तरुणांना चांगले रोजगार आणि कौशल्ये प्रदान करणे हे उद्दिष्ट आहे. देशातील कोणतीही कंपनी जी याचा भाग होण्याची इच्छा करते ती याचा भाग होऊ शकते.
SSC CPO Paper 2 Result 2024: एसएससी सीपीओ पेपर 2 चा निकाल जाहीर; दिल्ली पोलिस SI मेरिट लिस्ट OUT
अर्ज कसे कराल?
ज्या उमेदवारांना पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करायची इच्छा आहे. ते अधिकृत वेबसाइट pminternship.mca.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो.
महत्वाचे कागदपत्रे कोणते?
पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावी, बारावी, पदवी, आयटीआय, पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा पदवी असणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा काय ?
पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे. त्याच वेळी, राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
स्टायपेंड किती देण्यात येणार ?
पीएम इंटर्नशिप योजनेसाठी निवडलेल्या तरुणांना केंद्र सरकारकडून दरमहा ४५०० रुपये स्टायपेंड मिळेल आणि कंपन्या त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून ५०० रुपये देतील. यासोबतच, ६,००० रुपयांचे एकरकमी प्रवेश अनुदान दिले जाईल.
इंटर्नशिपची कालावधी किती?
पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांचा इंटर्नशिप कालावधी १२ महिने असेल. ज्यामध्ये त्यांना किमान ६ महिने व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाईल. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपशील तपासू शकतात.
SSC CGL २०२५ Postponed: SSC CGL २०२५ परीक्षा पुढे ढकलण्यात आली, लवकरच तारीख जाहीर होणार