फोटो सौजन्य- सोशल मीडिया
या अल्बम सॉंगचे निर्माते प्रतीक्षा सुकाळे प्रस्तुत ‘क्लासिक मराठी, न्हावरे’या या बॅनर खाली निर्मिती केले आहे. या अल्बमचे दिग्दर्शन अक्षय वेताळ यांनी केले असून सह दिग्दर्शक म्हणून बाळा बोरकर यांनी काम पाहिले आहे. या गीताच्या लेखिका प्रतीक्षा सुकाळे, गायिका प्रणाली सुकाळे यांनी आपल्या सुमधुर आवाजाने गीताला सुंदर असे रूप दिले आहे. प्रणाली अवघी सात वर्षांची असून इतक्या लहान वयात सुंदर असे आवाजात गाणे गायले आहे.
या गीताचे रेकॉर्डिंग द कन्सेप्ट म्युझिकल स्टुडिओ, पुणे या ठिकाणी करण्यात आले आहे. अल्बममध्ये प्रतीक्षा सुकाळे, प्रणाली सुकाळे, रामहरी सुकाळे, मिथुन धवन, राहुल जाडकर, स्वराज मेने, बाळा बोरकर, अबोली अल्लापुरकर, सुरेखा जाडकर, माधुरी लोखंडे, प्रीती मेने, दूर्वा अल्लापुरकर आणि श्रेयस सुरवसे यांनी भूमिका साकारल्या आहेत. या अल्बमला चैतन्य आढागळे, भोलेनाथ जगताप, पवन मोरे आणि सुरज जगताप यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
पुण्याचा गणपती आहे सोन्याचा या भक्तिगीताचे चित्रीकरण पुणे जिल्ह्यात करण्यात आले असून, गीतातील भक्तिमय वातावरण, कलाकारांचा अभिनय आणि आकर्षक चित्रीकरण यामुळे हे गाणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साकारलेले हे भक्तिगीत प्रेक्षकांच्या मनाला भावत असून, पुण्याचा गणपती आहे सोन्याचा या अल्बमला मिळत असलेला प्रतिसाद कलाकार व संपूर्ण टीमचा उत्साह वाढवणारा ठरत आहे.






