फोटो सौजन्य - Social Media
राज्यात या भरतीची खूप प्रतीक्षा होती. अखेर महावितरणने या भर्तीला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.महावितरण महाराष्ट्रातील विद्युत क्षेत्रातील अग्रेसर कंपनी आहे. या अग्रेसर कंपनीमध्ये काम करण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक असतात. अखेर नवं तरुणांसाठी या कंपनीने संधी आणली आहे. अप्रेंटिसच्या पदासाठी महावितरणने भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. ही भरती प्रक्रिया केवळ कमी पदांसाठी आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्वरित हालचाल करणे आवश्यक आहे. एकंदरीत, महावितरणने या भरतीच्या प्रक्रियेतून एकूण ८५ उमेदवारांना अप्रेंटिसशीप देऊन कंपनीतील कामे शिकण्याची संधी देणार आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज कार्यास इच्छुक आहात तर त्वरित पावले उचला.
हे देखील वाचा : ITBP मध्ये नवीन भरतीला होणार सुरुवात; जाणून घ्या ‘या’ भरतीविषयी
महावितरणच्या या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यामध्ये उमेदवारांना काम करता येणार आहे. इतर भरतींसारखे या भरतीमध्येही अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहे. या अटी सह्रति शैक्षणिक आहेत, तसेच वयोमर्यादेविषयी काही अटी जाहीर करण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेविषयी सखोल माहिती मिळवण्यासाठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये या भरतीविषयक सर्व माहितीची नोंद आहे.
महावितरणच्या या भरती प्रक्रियेमध्ये वायरमन तसेच लाईटमॅनसारख्या विविध विभागांसाठी अप्रेंटिसशिप पुरवण्यात येणार आहे. किमान दहावी शिक्षण असलेले तसेच संबंधित क्षेत्रामध्ये ITI चे प्रमाणपत्र असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
हे देखील वाचा : मुंबई महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्डसाठी भरती; जाणून घ्या या व्हॅकन्सी बाबत
निवडप्रक्रियेमध्ये मेरीटचा समावेश आहे. एकंदरीत, मेरिट लिस्टच्या नुसार उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवाराना काही प्रमाणात वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. जास्तीत जास्त ५ वर्षे सूट देण्यात येईल. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांना १५ ऑक्टोबरपर्यंत महावितरणच्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे.