फोटो सौजन्य - Social Media
जवाहरलाल इंस्टीट्यूट ऑफ पोस्टग्रेजुएट मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च (JIPMER)ने भरतीला सुरुवात केली आहे. या भरतीच्या माध्यमातून फॅकल्टी पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीमध्ये प्रोफेसर तसेच सहायक प्रोफेसर पदासाठी उमेदवार निवडले जाणार आहेत. एकूण ८० रिक्त जागांना भरण्यासाठी ही भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे. अद्याप, या भरतीला सुरु करण्यात आले नाही आहे. या भरतीच्या प्रक्रियेत सहभाग घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑक्टोबरच्या २५ तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात करायची आहे. उमेदवारांना २१ नोव्हेंबर २०२४ या तारखेपर्यंत अर्ज कर्ता येणार आहे.
हे देखील वाचा : निवृत्त बॅंक कर्मचारी होणार डॉक्टर, 64 व्या वर्षी मिळविले नीट परीक्षेत दैदिप्यमान यश
JIPMER च्या दोन्ही शाखांमध्ये या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये पुडुचेरीमध्ये स्थित असलेल्या जवाहरलाल इंस्टीट्यूट ऑफ पोस्टग्रेजुएट मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च संस्थेमध्ये प्रोफेसरचे २६ रिक्त पदे तर सहायक प्रोफेसर पदाचे ३६ पदांचा समावेश आहे. तर कराईकल येथे स्थित असलेल्या जवाहरलाल इंस्टीट्यूट ऑफ पोस्टग्रेजुएट मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च संस्थेमध्ये प्रोफेसर पदाचे २ पद आणि सहायक प्रोफेसर पदाच्या १७ रिक्त जागांचा विचार केला जाणार आहे.
या भरती संदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, प्रोफेसर पदासाठी जास्तीत जास्त ५८ वर्षे आयु असणारे उमेदवार अर्ज करू शकतात. तर असिस्टंट प्रोफेसर पदासाठी ५० वर्षे आयु असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच इतर मानदंड आणि अटी शर्तीविषयी जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. सामान्य क्ष्रेणीतील उमेदवार तसेच ईडब्ल्यूएस/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना १५०० रुपये + अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज शुल्काची रक्कम एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १२०० रुपये आहे. तसेच त्यांनाही अतिरिक्त शुल्क भरावा लागणार आहे. दिव्यांग उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही.
हे देखील वाचा : टाऊन प्लॅनर भरतीसाठी सुरुवात; MPSC ची बंपर भरती, त्वरित करा अर्ज
उमेदवारांनी अर्जाची हार्ड कॉपी ‘सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, प्रशासन 4 (फॅकल्टी विंग) दुसरा मजला, प्रशासकीय ब्लॉक, JIPMER धन्वंतरी नगर, पुडुचेरी ६०५००६’ आणि सॉफ्ट कॉपी facrectt2024@jipmer.ac.in वर सर्व आवश्यक कागदपत्रांसह पाठवावी. अधिकृत अधिसूचनेत नमूद असलेल्या सर्व दस्तऐवजांची जोड याला असुद्यावेत.