फोटो सौजन्य - Social Media
इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये तंत्रज्ञ (डिप्लोमा) आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या आणि पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन तसेच ओंफलाईन अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज 15 जानेवारी 2025 पर्यंत करू शकतात, तर ऑफलाईन अर्ज 25 जानेवारी 2025 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्रता व मापदंड तपासणे गरजेचे आहे. इच्छुक उमेदवाराना या पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे.
अशा प्रकारे करता येईल ऑनलाईन अर्ज:
अशा प्रकारे करता येईल ऑफलाईन अर्ज:
अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. हे पात्रता निकष शैक्षणिक आहेत आणि वयोमर्यादे संबंधित आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी अर्ज कर्ते उमेदवार अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान क्षेत्रात पदवीधर असावे किंवा संबंधित शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस पदासाठी अर्ज कर्ता उमेदवार अभियांत्रिकी/तंत्रज्ञान क्षेत्रात डिप्लोमाधारक असणे आवश्यक आहे. अधिसूचनेमध्ये वयोमर्यादे संबंधित अटी शर्ती नमूद आहेत. त्या अनुसार, किमान १८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच जास्तीत जास्त ३० वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट देण्यात येईल.
उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या आधारे केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना एका वर्षासाठी नियुक्ती दिली जाईल. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवाराला ₹10,000 प्रतिमहिना मानधन दिले जाईल. तसेच तंत्रज्ञ (डिप्लोमा) अप्रेंटिस पदी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला ₹8,500 प्रतिमहिना स्टायपेंड दिले जाईल. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.