फोटो सौजन्य - Social Media
भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) या संस्थेने भारतात नव्या रोजगार निर्मितीला चालना दिली आहे. BHEL मध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना आपली करिअरचा श्रीगणेशा करण्याची ही उत्तम संधी आहे. BHEL ने अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करू इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण १०० उमेदवारांना अप्रेंटिसशिप पुरवण्यात येणार आहे. यातील २० पदे फिटर, ४० पदे मशिनिस्ट, २६ पदे टर्नर तसेच १४ पदे वेल्डर साठी आहेत.
अप्रेंटिस पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांची कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवारांकडे आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. एकंदरीत, ‘ज्याच्या कडे असेल आयटीआय प्रमाणपत्र, तोच ठरेल अर्ज करण्यास पात्र’ असा फॉर्मुला BHEL ने वापरला आहे. शैक्षणिक अटींबरोबरच वयोमर्यादे विषयक अटी देखील जाहीर करण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे तर कमाल वय २७ वर्षे इतके असणे अनिवार्य आहे.
उमेदवारांना अप्रेंटिस पदी अर्ज करण्यासाठी BHEL च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दयावी लागेल. अर्ज करण्याची पद्धत पूर्णतः ऑनलाईन आहे. तसेच या भरती संबंधित अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेणयासाठी उमेदवारांनी apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. येथेच उमेदवारांना अर्ज नोंदवता येईल. उमेदवारांची निवड लिखित परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. या परीक्षेचे आटोजण २४ सप्टेंबर रोजी करण्यात येईल. तासभराच्या या परीक्षेमध्ये ५० प्रश्न विचारले जातील. या परीक्षेसंबंधित अधिक तसेच सखोल माहिती मिळवण्यासाठी अधिसूचनेचा आढावा घ्या.
हे देखील वाचा : निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पातील घोषणेसंबंधी मोठे पाऊल! बँका मोठ्या प्रमाणात देणार अप्रेन्टिसशिपची संधी
अशा प्रकारे करता येईल अर्ज