फोटो सौजन्य - Social Media
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनांसने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची जूनियर एग्जीक्यूटिव पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांनी या भरतीसाठी अधिक माहितीसाठी या अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा, जेणेकरून अर्ज प्रक्रिया अधिक सोप्या पद्धतीने होईल आणि अर्ज प्रक्रियेदरम्यान अडचणी टाळता येतील. या भरतीला सुरुवात झाली आहे. तसचे अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी १६ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत अर्ज करता येईल. उमेदवाराना या भरतीसाठी अर्ज करताना ऑनलाईन स्वरूपात करावयाचे आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IIBF च्या https://www.iibf.org.in या अधिकृत संकेस्थळाला भेट द्यावी.
हे देखील वाचा : शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रूग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन!
IIBF च्या या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र होणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती वयोमर्यादा तसेच उमेदवारांच्या शिक्षणासंदर्भात आहेत. या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवाराचे जास्तीत जास्त वय २८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांना अर्ज करताना ७०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. IIBF द्वारे आयोजित या भरती प्रक्रियेमध्ये काही निवड प्रक्रियेचा समावेश आहे, ज्याच्या माध्यमातून उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवाराची परीक्षा घेण्यात येणार आहे.
ही परीक्षा मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई तसेच कोलकत्तामध्ये आयोजित करण्यात येईल. अर्ज कर्त्या उमेदवारांच्या यादीतील काही शॉर्ट लिस्टेड उमेदवारांनाच या परीक्षेसाठी तसेच स्वाक्षरीसाठी बोलावले जाईल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनांसमध्ये रिक्त असलेल्या जूनियर एग्जीक्यूटिवच्या पदांसाठी राबवण्यात येणाऱ्या भरतीसाठी अशा प्रकारे करता येईल अर्ज:
हे देखील वाचा : ITBP ने केली भरतीला सुरुवात; ५४५ पदांसाठी होणार उमेदवारांची नियुक्ती, त्वरित करा अर्ज