फोटो सौजन्य - Social Media
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. या भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. २५३ रिक्त पदांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करू पाहणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. चीफ मॅनेजर्स, सिनियर मॅनेजर, मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजरच्या पदांसाठी काही रिक्त जागा आहेत. या पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. उमेदवारांना काही ठरविक कार्यकाळापर्यंतच या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. १८ नोव्हेंबर २०२४ तारखेपासून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. तर डिसेंबरच्या ३ तारखेपर्यंत या भरतसीतही अर्ज करता येणार होते. या भरतीच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाने या भरतीचे आयोजन केले आहे. IT तसेच इतर विभागामध्ये या भरतीला सुरुवात करण्यात आले आहे. स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजली गेली आहे. संपूर्ण भारतभरात या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुळात, महिला तसेच पुरुष उमेदवारांनाही या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. centralbankofindia.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. मुळात, आज या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. १४ डिसेंबर रोजी या भरती संदर्भात परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना या परीक्षेसाठी उपस्थित राहायचे आहे.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना ८५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तसेच OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील या भरतीसाठी सारखी रक्कम भरायची आहे. अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी १७५ रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तसेच या अर्ज शुल्कबरोबर GST रक्कमही आकारण्यात येईल.
अशा प्रकारे करता येईल अर्ज