फोटो सौजन्य - Social Media
नोकरीतून निवृत्ती घेतलेल्या आणि वर्कलाइफला मिस करणाऱ्या लोकांसाठी दिल्ली मेट्रोने एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. मुंबईची लोकल ट्रेन मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते. त्याचप्रकारे दिल्लीची लाईफलाईन म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या मेट्रोमध्ये दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) कडून सुपरवायझर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ९ जानेवारी २०२५ पासून सुरू झाली आहे. तर उमेदवारांना ३० जानेवारी २०२५ या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. मुळात, या मुदतीनंतर करण्यात आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात, या भरतीच्या प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती.
ही पदभरती सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन विभागासाठी केली जात आहे. पदांशी संबंधित सविस्तर माहिती अर्जदार अधिकृत नोटिफिकेशनद्वारे तपासू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ, महाविद्यालय किंवा संस्थेतून पूर्णवेळ ३ वर्षांचा डिप्लोमा किंवा संबंधित शाखेत पदवी असणे आवश्यक आहे. एकंदरीत, अर्ज करता उमेदवार इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, आयटी, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग या विषयांमध्ये उमेदवार शिक्षित हवा.
वयोमर्यादा संबंधित नमूद असणाऱ्या अटीनुसार, डेप्युटेशनसाठी अधिकतम वय ५५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. पीआरसीईसाठी (Post Retirement Contractual Engagement) वयोमर्यादा किमान ५५ वर्षे आणि जास्तीत जास्त ६२ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. महत्वाची बाब म्हणजे उमेदवारांचा पगार त्यांच्या निवृत्तीपूर्वीच्या पगाराच्या आधारे निश्चित केला जाईल. या भरती प्रक्रियेची सर्वात विशिष्ट बाब म्हणजे या पदभरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड थेट व्यक्तिगत मुलाखतीद्वारे केली जाईल. त्यामुळे उमेदवारांना परीक्षेला उपस्थित राहणे तसेच प्रवेशपत्र कसे काढावे? अशा गोष्टींसाठी जास्त भार घेण्याची गरज भासणार नाही आहे. महत्वाचे म्हणजे अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्जदारांनी ३० जानेवारी २०२५ पर्यंत खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा:
“जनरल मॅनेजर/एचआर/पी, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, फायर ब्रिगेड लेन, बाराखंबा रोड, नवी दिल्ली”
अधिक माहितीसाठी
दिल्ली मेट्रोच्या या भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी DMRC ची अधिकृत वेबसाइट delhimetrorail.com ला भेट द्या.