नवी मुंबई महापालिकेत वैदयकीय अधिकारी पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती; मिळणार 60 हजार पगार!
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. नवी मुंबई महापालिकेत (Navi Mumbai Municipal Corporation) रिक्त पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे पात्र उमेदवार या संधीचा लाभ घेऊन सरकारी नोकरी मिळवू शकतात. नेमकी किती पदासांठी भरती निघाली आहे. अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेऊयात…
नवी मुंबई महापालिकेतील या भरतीच्या माध्यमातून वैदयकीय अधिकारी पदांच्या 54 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखत आठवड्यातील प्रत्येक बुधवारी होणार आहे. त्यामुळे आता कोणतीही परिक्षा न देता किंवा कोणताही अधिकचा अभ्यास न करता, तुमच्या आरोग्य क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर तुम्हांला ही नोकरी थेट मुलाखतीद्वारे मिळणार आहे.
संस्थेचे नाव – नवी मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद – वैदयकीय अधिकारी
एकुण रिक्त पद संख्या – 54 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नवी मुंबई
वयोमर्यादा – 70 वर्षे
कशी होणार निवड
वैदयकीय अधिकारी भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड ही थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आठवड्यातील प्रत्येक बुधवारी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कोणतीही परिक्षा न देता किंवा कोणताही अधिकचा अभ्यास न करता तुम्हांला थेट मुलाखतीद्वारे ही नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा – पुण्यात नोकरीची मोठी संधी, अडीच लाखापर्यंत मिळेल पगार; वाचा… सविस्तर जाहिरात!
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई – 400614
मुलाखतीची तारीख – आठवड्यातील प्रत्येक बुधवारी
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
वैदयकीय अधिकारी – मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक, शासकीय / खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक आहे.
किती मिळणार पगार
वैदयकीय अधिकारी – 60,000 रुपये प्रति महिना
कसा कराल अर्ज
नवी मुंबई महापालिकेच्या (Navi Mumbai Municipal Corporation) वैदयकीय अधिकारी पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी आरोग्य विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई – 400614 या पत्त्यावर जाऊन अर्ज करायचा आहे. जो मुलाखतीच्या दिवशी तुमच्याकडून अगोदर भरून घेतला जाईल. विशेष म्हणजे मुलाखतीला येताना उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहायचे आहे. ही मुलाखत आठवड्यातील प्रत्येक बुधवारी होणार आहे. असे नवी मुंबई महापालिकेने आपल्या जाहिरातीत म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी नवी मुंबई महापालिकेच्या https://www.nmmc.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.