फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) ने CEN 04/2025 अंतर्गत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. या भरतीअंतर्गत एकूण 368 जागा उपलब्ध आहेत. भारतीय रेल्वेत करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. आज या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी सेक्शन कंट्रोलर कोर्स पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीविषयी वयोमर्यादा निश्चित करण्यात आल्या असून, 1 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 33 वर्षांदरम्यान असावे. नियमांनुसार वयमर्यादेत सवलत लागू होईल.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. विविध आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्काची रक्कम वेगवेगळी आहे. सर्वसाधारण / OBC आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यासाठी ₹500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. SC / ST / PwBD / महिला उमेदवारांना ₹250 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
निवड प्रक्रिया पाहिली, तर चार टप्प्यांमध्ये उमेदवारांची निवड करण्यात येईल. यामध्ये संगणक आधारित परीक्षा (CBT) घेण्यात येईल. यानंतर CBAT टेस्ट पात्र करावी लागेल. दस्तऐवज पडताळणीसह वैद्यकीय चाचणी या टप्प्यांना पात्र करत उमेदवारांना या भरतीसाठी नियुक्त होता येणार आहे.
परीक्षा नमुना :
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा केले जातील.
अर्ज प्रक्रिया:
उमेदवारांनी RRB च्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करून फी भरावी आणि सबमिट केल्यानंतर प्रिंटआउट जतन करून ठेवावा.
रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) हा भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या (Ministry of Railways) अंतर्गत कार्यरत असलेला एक प्रमुख भरती मंडळ आहे. याचे मुख्य कार्य म्हणजे भारतीय रेल्वेमधील विविध विभागांमध्ये आवश्यक असलेल्या तांत्रिक आणि गैर-तांत्रिक पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करणे. सध्या भारतात 21 RRB कार्यालये कार्यरत आहेत — जसे की मुंबई, अहमदाबाद, भोपाळ, चेन्नई, गोरखपूर, कोलकाता, पटना, बिलासपूर, चंदीगड, गुवाहाटी, आणि इतर ठिकाणी. प्रत्येक RRB आपल्या संबंधित विभागासाठी भरती प्रक्रिया पार पाडते.
टीप: आज अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तत्काळ अर्ज प्रक्रिया पूर्ण करा!