फोटो सौजन्य - Social Media
रेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत टेक्नीशियन पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 6238 पदे भरली जाणार असून, यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2025 होती. मात्र, उमेदवारांचा प्रतिसाद लक्षात घेता ही तारीख 7 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.rrbapply.gov.in वर जाऊन अर्ज दाखल करावेत.
या भरती प्रक्रियेमध्ये दोन प्रकारचे पद उपलब्ध आहेत. टेक्नीशियन ग्रेड-I (सिग्नल) साठी 183 पदे आणि टेक्नीशियन ग्रेड-III साठी 6055 पदे. ग्रेड-I हे लेव्हल 5 चं पद असून, त्यासाठी शैक्षणिक पात्रता म्हणून B.Sc. (फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, IT, इन्स्ट्रुमेंटेशन), BE/B.Tech किंवा तीन वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा आवश्यक आहे. तर ग्रेड-III हे लेव्हल 2 चं पद असून, यासाठी 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्र आवश्यक आहे. काही पदांकरिता 12वीमध्ये फिजिक्स आणि गणित विषय अनिवार्य आहेत.
वयोमर्यादा: ग्रेड-I साठी 18 ते 33 वर्षे आणि ग्रेड-III साठी 18 ते 30 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. आरक्षणाच्या नियमांनुसार SC/ST उमेदवारांना 5 वर्षे व OBC उमेदवारांना 3 वर्षांची सवलत दिली जाईल.
निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत होणार आहे. लेखी परीक्षा (CBT), वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्र पडताळणी. दोन्ही पदांसाठी CBT परीक्षा 90 मिनिटांची असेल व त्यामध्ये 100 प्रश्न विचारले जातील. ग्रेड-I मध्ये जनरल अवेअरनेस, रिझनिंग, कंप्युटर बेसिक्स, गणित आणि बेसिक सायन्स/इंजिनिअरिंग विषयांचा समावेश असेल. ग्रेड-III मध्ये जनरल अवेअरनेस, रिझनिंग, गणित आणि जनरल सायन्स यावर आधारित प्रश्न असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 गुण वजा करण्यात येतील.
अर्ज शुल्क: सामान्य/OBC/EWS प्रवर्गासाठी ₹500 असून, CBT परीक्षा दिल्यास ₹400 परत केले जातील. SC/ST/महिला/EBC/PwD प्रवर्गासाठी ₹250 असून, परीक्षा दिल्यानंतर संपूर्ण रक्कम परत मिळेल. ही भरती 2025 मधील एक मोठी संधी मानली जात असून, उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी आपले अर्ज नोंदवून ही संधी हातून जाऊ देऊ नये.