
फोटो सौजन्य- साथी वेबसाईट
आज विद्यार्थ्यांमध्ये प्रंचड स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेतूनच बहुतांश विद्यार्थी हे इंजिनीअरिंग, मेडिकल किंवा कोणत्याही महत्वाच्या शाखेची तयारी करताना क्लासेस लावतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या विषयाचे मार्गदर्शन केले जातेच आणि महत्वाचे म्हणजे त्यांची परीक्षेची तयारी केली जाते. ज्या विद्यार्थ्यांना हे क्लासेस करणे परवडत नाही त्यांना मात्र स्व:अध्ययन करावे लागते. त्यामध्ये काहीवेळा या विद्यार्थ्यांचे प्रयत्न अपूर पडतात. मात्र आता सरकारकडूनच विद्यार्थ्यांना अशा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे पोर्टल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ज्याद्वारे देशातील कोणताही विद्यार्थी अगदी मोफत घरबसल्या परीक्षांची तयारी करु शकतो. जाणून घेऊया या पोर्टलबद्दल
देशात इंजिनीअरिंग, मेडिकल ,बॅंकिंग आयसीएआर इत्यादी परीक्षेची तयारी करत आहात, तर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून चालविण्यात येणाऱ्या ‘साथी’ या पोर्टलद्वारे तुम्ही या सर्व परीक्षांची मोफत तयारी करू शकता. या पोर्टलचे अॅप देखील उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या परीक्षांची तयारी आयआयटी प्राध्यापक/विषय तज्ञांकडून केली जाणार आहे. यासोबतच पोर्टलवर, लाइव्ह क्लासेस, NCERT व्हिडिओ सोल्यूशन्स, AI आधारित मूल्यांकन प्लॅटफॉर्म, प्राध्यापकांचे रेकॉर्ड केलेले व्हिडिओ इत्यादी देखील विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध असणार आहेत. यामुळे तुम्ही परीक्षेसाठी योग्य तयारी करु शकता.
हे देखील वाचा-UPSC चे वर्ष २०२५ रिवाईज्ड कॅलेंडर जाहीर; जाणून घ्या परीक्षेच्या तारखा
साथीमध्ये (Sathee) भरती परीक्षांचाही समावेश
या पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या प्रवेश परीक्षांच्या तयारीसोबतच आता साथी पोर्टलवर नोकरींच्या भरती परीक्षेंचा ही समावेश करण्यात येत आहे. तुम्ही बँकिंग संबंधित भरतीसाठी येथे मोफत तयारी करू शकता. याशिवाय एसएससीची (स्टाफ सिलेक्शन कमिशन)ची तयारीही या पोर्टलवर मोफत केली जाते. यासाठी तुम्ही साथी (Sathee) पोर्टलला भेट देऊन विनामूल्य नोंदणी करू शकता आणि तुमची परीक्षेसाठीची तयारी पूर्ण करू शकता.
भविष्यात या पोर्टलवर CUET, कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (CLAT) इत्यादी परीक्षासंबंधी तयारीसाठीही मार्गदर्शन केले जाणार आहे. जेणेकरून या विभागातील विद्यार्थ्यांना देखील विनामूल्य तयारीचा लाभ मिळू शकेल.
साथीमध्ये नोंदणी कशी करावी?
तुम्हाला प्रथम sathee.prutor.ai या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
वेबसाइटच्या होम पेजवर, तुम्हाला ज्या विषयामध्ये तयारी करायची आहे. त्याच्या पुढे Start Learning वर क्लिक करा.
आता अभ्यासक्रम/भरती निवडा.
त्यानंतर Enroll Now लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
नोंदणी झाल्यानंतर तुम्ही त्या परीक्षेसाठी तयारी करु शकता.