फोटो सौजन्य - Social Media
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP)ने अधिसूचना जाहीर केली आहे. नव्या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे . या भरतीच्या माध्यमातून ४८ रिक्त जागा भरण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांना २१ जानेवारी २०२५ पासून या भरतीसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. असिस्टंट कमांडंटच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. टेलिकॉम विभागामध्ये काम करू पाहणारे या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भारतीसत्रही अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना काही पात्रता निकषांनापात्र करावे लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या भरती संदर्भात काही महत्वाची माहिती:
आजपासून या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. अर्ज करण्याची विंडो १९ फ्रेब्रुवारी २०२५ पर्यंत खुली असणार आहे. इच्छुक उमेदवार या वेळेत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. मुळात, अर्ज करताना उमेदवारांकडून अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ४०० रुपये भरावे लागणार आहेत. तसेच OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांनादेखील ४०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. इतर काही आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज अगदी निशुल्क करता येणार आहे. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला तसेच ESM या प्रवर्गांचा समावेश आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
या भरतीसाठी काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. एकंदरीत, या पात्रता निकषांना पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत. तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. किमान १८ वर्षे वय असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर या भरतीसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
तर अधिसूचनेमध्ये नमूद असलेल्या शैक्षणिक अटीनुसार, संबंधित क्षेत्रात पदवीधर असणाऱ्या उमेदवाराना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरती संबंधात अधिक माहितीसाठी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. जाहीर अधिसूचनेमध्ये या भरती संदर्भात सखोल माहिती पुरवण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी तसेच या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी ITBP च्या recruitment.itbpolice.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यात यावी.