Sinhagad Medical College: कोट्यावधींचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांचे काय? हायकोर्टाचा संताप!

Sinhagad Medical College: सिंहगड संस्थेतील कथित गैरव्यवहार, थकीत वेतन व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने MUHS आणि वैद्यकीय नियमकांना फटकारले.
career
फोटो सौजन्य - एआयcareer
Published on: 
Updated on: 

Sinhagad Medical College: सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीशी (एसटीईएस) संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार, थकीत वेतन आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयाने एमयूएचएस आणि वैेद्यकिय नियमकांवर तीव्र संताप व्यक्त केला. मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी कोट्यावधी रुपयांचे शुल्क भरले असून महाविद्यालयाची संलग्नता रद्द झाल्यास किंवा कामकाज ठप्प झाल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे सुरू राहणार असा प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला आहे.

या सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, महाविद्यालयातील अध्यापन व कामकाज विस्कळीत झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य सरकारने तत्काळ उपाययोजना कराव्यात आणि आवश्यकतेनुसार प्रशासक नेमण्याबाबत विचार करावा.

तसेच, पूर्वीच्या आदेशानुसार नियामक अधिकाऱ्यांनी संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्याचे काम पाच दिवसांतही पूर्ण न केल्याबद्दल खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त करत दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाईचा इशारा दिला असून, एमयूएचएसच्या कुलसचिवांना उद्या २७ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

career
Indian Army Career: लष्करात कसे बनता येते लेफ्टिनेंट कर्नल? जाणून घ्या प्रमोशनचे संपूर्ण टप्पे!

संस्थेच्या विश्वस्तांना खंडपीठाने दिले 'हे' स्पष्ट निर्देश

आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेबाबत कठोर भूमिका घेत न्यायालयाने प्रतिज्ञापत्रांतील २७ कोटी रुपयांसह निधीचे वितरण, काढलेल्या रकमा आणि बँक खात्यांच्या संख्येतील विसंगतीची तपासणी करण्याचे आदेश महाधिवक्ता मिलिंद साठे यांना दिले आहेत. यासोबतच सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तपासाच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा, तसेच तपास अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय संस्थेच्या विश्वस्तांनी व सदस्यांनी देशाबाहेर जाऊ नये, असे स्पष्ट निर्देशही खंडपीठाने दिले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून सिंहगड संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन आणि इतर देणी थकित असल्याच्या अनेक याचिका आणि अवमान याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. या प्रकरणात न्यायमूर्ती राजेश केतकर (निवृत्त) यांच्या एकसदस्यीय समितीचा अहवाल, विविध विभागांकडून येणारी शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम तसेच संस्थेच्या बँक खात्यांतील व्यवहारांची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहेत.

career
UGC NET 2026: यूजीसी नेटची एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप जारी! अशी करा डाऊनलोड; ॲडमिट कार्ड कधी येणार?

पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी होणार

दरम्यान, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मारुती निवृत्ती नवले यांनी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली प्रकृती अस्वस्थ असल्याची माहिती देत वैद्यकीय उपचारांचा तपशील नमूद केला आहे. तसेच सीबीआयच्या एसीबी पथकाने पाठवलेल्या समन्सला प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहण्यासाठी वेळ मागून आवश्यक कागदपत्रे सादर केल्याचेही त्यांनी म्हटले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ डिसेंबर रोजी होणार आहे.

Q

मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्या मुद्द्यांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे?

A

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीशी (STES) संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार, थकीत वेतन आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयाने एमयूएचएस (MUHS) आणि वैद्यकीय नियमकांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Q

विद्यार्थ्यांच्या शुल्काबाबत आणि संलग्नतेबाबत खंडपीठाने काय प्रश्न उपस्थित केला?

A

मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी कोट्यावधी रुपयांचे शुल्क भरले असून, महाविद्यालयाची संलग्नता रद्द झाल्यास किंवा कामकाज ठप्प झाल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण कसे सुरू राहणार, असा गंभीर प्रश्न खंडपीठाने उपस्थित केला आहे.

Q

या प्रकरणातील मुख्य तक्रारी कोणत्या आहेत?

A

संस्थेशी निगडित कथित आर्थिक गैरव्यवहार, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन आणि त्यामुळे निर्माण झालेली कामकाजाची व शैक्षणिक अनिश्चितता हे या प्रकरणातील प्रमुख मुद्दे आहेत.