ॲडमिट कार्ड कधीपर्यंत येणार
अशी डाऊनलोड करा एक्झाम सिटी स्लिप
उमेदवाराने प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करावा
UGC NET December 2026: एनटीए (NTA) कडून आयोजित केल्या जाणाऱ्या यूजीसी नेट डिसेंबर 2026 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. एनटीएने येत्या परीक्षेची सिटी इंटिमेशन स्लिप जारी केली आहे.
यंदाच्या परीक्षेला एकूण 9,75,505 उमेदवारांनी अर्ज केले असून ते देशभरातील केंद्रावर 87 विषयांची परीक्षा देणार आहेत. जेआरएफ, असिस्टंट प्रोफेसर नेमणूक आणि पीएचडी प्रवेशाची पात्रता निश्चित करणारी ही परीक्षा 14 ते 21 नोव्हेंबर दरम्यान सीबीटी पद्धतीने घेतली जाणार आहे. नोंदणीकृत उमेदवार एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्याला नेमके परीक्षा शहर कोणते मिळाले आहे, ते पाहू शकतात.
1. प्रथम उमेदवारांनी ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावे.
2. त्यानंतर होमपेजवर कँडिडेट ॲक्टिव्हिटी विभाग शोधावा.
3.आता यूजीसी नेट डिसेंबर 2026 सिटी इंटिमेशन स्लिप यावर क्लिक करावे.
4. अप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन तपशील सबमिट करावा.
5. आता तुम्हाला परीक्षा शहराची माहिती असलेली स्लिप स्क्रीनवर दिसेल.
6. ही सिटी स्लिप डाउनलोड करून तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.
एनटीएच्या माहिती पुस्तकेनुसार सर्व उमेदवारांचेॲडमिट कार्ड 7 डिसेंबर 2026 रोजी ऑनलाइन जारी केले जाऊ शकते. त्यामुळे परीक्षा शहराच्या माहितीनंतर परीक्षा कक्षात प्रवेशासाठी ॲडमिट कार्ड डाउनलोड करून नेणे अनिवार्य आहे.
यूजीसी नेट परीक्षा एकूण 3 तासांची असून पेपर 1 व पेपर 2 दरम्यान कोणताही ब्रेकर दिला जाणार नाही. दोन्ही विभागांत वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी प्रश्न असतील. भाषा विषयाचा पेपर वगळता प्रश्नपत्रिकेचे माध्यम हिंदी आणि इंग्रजी असून एकूण 300 गुणांची परीक्षा असेल.
प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 2 गुण तर चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही निगेटिव्ह मार्किंग नसेल. त्यामुळे उमेदवाराने प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करावा.
यूजीसी नेट डिसेंबर २०२६ च्या सिटी इंटिमेशन स्लिपबाबत कोणती अपडेट आली आहे?
एनटीएने (NTA) यूजीसी नेट डिसेंबर २०२६ परीक्षेची एक्झाम सिटी इंटिमेशन स्लिप जारी केली असून, नोंदणीकृत उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले परीक्षा शहर पाहू शकतात.
या परीक्षेसाठी किती उमेदवारांनी अर्ज केले आहेत आणि किती विषय आहेत?
यंदाच्या परीक्षेसाठी एकूण ९,७५,५०५ उमेदवारांनी अर्ज केले असून, ते देशभरातील केंद्रांवर ८७ विषयांसाठी सीबीटी (CBT) पद्धतीने परीक्षा देणार आहेत.
यूजीसी नेट परीक्षा कोणत्या पात्रतेसाठी घेतली जाते?
जेआरएफ (JRF), असिस्टंट प्रोफेसर नेमणूक आणि पीएचडी (PhD) प्रवेशाची पात्रता निश्चित करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाते.