फोटो सौजन्य - Social Media
युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सने दिल्ली विद्यपीठामध्ये सरकारी क्षेत्रामध्ये नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी भरतीची सुवर्णसंधी आणली होती. या भरतीला सुरुवात १९ सप्टेंबर पासून झाली आहे. या भर्तीसाठी अर्ज करण्यास अनेक उमेदवार इच्छुक आहेत, तसेच भरतीच्या सुरुवातीपासून अनेक उमेदवारांनी या भर्तीसाठी अर्जाची नोंद केली आहे. ज्युनिअर असिस्टंट्च्या पदासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली असून, या भरतीची आज शेवटची तारीख आहे.
हे देखील वाचा : अग्नीवर वायू सिलेक्शन टेस्टच्या तारखेत बदल; परीक्षा ‘या’ तारखेला घेण्यात येईल
उमेदवारांना ऑक्टोबरच्या ९ तारखे पर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. एकंदरीत, आज या मदतीला पूर्णविराम लागणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आजच्या आज आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन DU ने केले आहे. कामाचे ठिकाण दिल्ली येथे असणार आहे. महत्वाची बाब अशी आहे कि संपूर्ण देशभरातील इच्छुक असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे परराज्यामध्ये काम करण्यास जाण्यास इच्छुक आणि तयारी असलेल्या उमेदवारांनी या संधीचा जरुर लाभ घ्यावा.
या भरतीच्या प्रक्रियांमध्ये ज्युनिअर असिस्टंट्च्या २९ पदाचा विचार केला जाणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करायचे आहे. तसेच या भरती संदर्भात अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या अधिसूचनेचा आढावा घ्यावा. यामध्ये या भरती संदर्भात अधिक आणि सखोल माहिती पुरवण्यात आली आहे, याचा अभ्यास करून उमेदवारांना या भरतीच्या प्रक्रियेबद्दल अधिकची माहिती नक्कीच मिळवता येणार आहे.
हे देखील वाचा : शासकीय योग आणि निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रूग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन!
या भरतीसाठी स्त्री पुरुष दोघे अर्ज करू शकतात. महत्वाचे म्हणजे या भरतीमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला मासिक वेतन म्हणून 19900 रूपये ते 63200 रूपये मिळू शकतात. या भरतीमध्ये नियुक्त होण्यासाठी उमेदवारांना निवड प्रक्रियेचे काही टप्पे उत्तीर्ण करावे लागणार आहेत. यामध्ये लेखी परीक्षेचाही समावेश आहे. परंतु, त्याचबरोबर टाइपिंग टेस्टही पार करावी लागेल. तसेच अन्य काही टप्प्यांना उत्तीर्ण करत,उमेदवार या नियुक्तीस पात्र ठरतील. ओबीसी तसेच ईडब्ल्यूएस प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५०० रुपये भरावे लागणार आहेत. तसेच एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातून येणारे उमेदवार तसेच महिला उमेदवारांना या भरतीसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे. लक्षात असू द्या कि, उमेदवारांना अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.