फोटो सौजन्य - Social Media
भारतीय सैन्यात काही दिवसांपूर्वी आर्मी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या अधिसूचनेचा माध्यमातून इच्छुक उमेदवारांना या कोर्सबद्दल संपूर्ण माहिती पुरवण्यात आली होती. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार होते. अर्जसाठी उमेदवारांनी joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यात यावी. १८ सप्टेंबर २०२४ पासून उमेदवारांना अर्ज करता येणार होते. आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. १७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार होते.
हे देखील वाचा : JIPMPER मध्ये प्रोफेसर पदासाठी भरतीला सुरुवात; ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज
लेफ्टनंटच्या पदासाठी ही भरती आहे. यामध्ये एकूण ३० पदांसाठी व्हॅकन्सी निघाली आहे. महत्वाची बाब म्हणजे ही व्हॅकन्सी संपूर्ण भारतभर आहे. संपूर्ण भारतभरातील इच्छुक उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. आर्मी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी वेतनमान दिला जाणार आहे. लेव्हल १० च्या अनुसार, नियुक्त उमेदवाराला ५६,१०० रुपये ते १,७७,५०० रुपये पगार दिला जाईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
मुळात, इतर व्हॅकन्सीप्रमाणे, या व्हॅकन्सीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणतीही रक्कम आकारण्यात येणार आहे. या व्हॅकन्सीसाठी अर्ज करू पाहणारे उमेदवार अगदी सोप्या पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकतात. एकंदरीत, उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. ठराविक शिक्षण झालेले तसचे एका ठराविक वयोगटातील उमेदवाराच या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २० निश्चित करण्यात आले आहे. तर जास्तीत जास्त २७ वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर लेफ्टनंटच्या या पदासाठी अर्ज करू पाहणारे उमेदवार बी.ई किंवा बी.टेकमध्ये पदवीधर हवे.
हे देखील वाचा : CAPF ने भरतीच्या प्रक्रियेला केली सुरुवात; मेडिकल ऑफिसरच्या पदासाठी होणार भरती
उमेदवारांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेत काही टप्प्यांचा समावेश आहे. या टप्प्यांना पात्र करत उमेदवार या भरतीच्या प्रक्रियेत नियुक्त होऊ शकतो. नियुक्तीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. तसेच उमेदवाराची SSB मुलखात घेतली जाईल. यानंतर उमेदवारांना दस्तऐवजांच्या पडताळणीसाठी बोलावले जाईल. तसेच उमेदवारांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. या चार टप्प्यांत उमेदवारांची निवड केली जाईल.