फोटो सौजन्य - Social Media
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (ITBP)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली होरी. या संदर्भांत अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यागोदर जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. यामध्ये या भरतीच्या संदर्भात सखोल माहिती जाहीर करण्यात आली होती. याचा आढावा उमेदवारांना घेता येणार आहे. ८ ऑक्टोबर २०२४ रोजी या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. या भरतीसाठी अनेक उमेदवारांनी अर्ज नोंदवला आहे. तर काही उमेदवारांनी इच्छा असूनही काही कारणास्तव अर्ज करू शकले नाही. जर तुम्हालाही या भरतीसाठी अर्ज करायचे आहे, तर नक्कीच तुम्ही ते करू शकता. इच्छुक असलेल्या उमेदवारांना आजच्या आज अर्ज करायचे आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत संपत आली आहे. आज म्हणजे ६ नोव्हेंबर या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
हे देखील वाचा : UIIC मध्ये भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख; आजच करा अर्ज, अन्यथा संधीला मुकाल
कॉन्स्टेबल (ड्राइवर)च्या पदासाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजीत करण्यात आली आहे. एकूण ५४५ रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात नियुक्त उमेदवारांना नियुक्ती मिळणार आहे. recruitment. itbplice. nic. in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे असल्याने उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करताना या संकेतस्थळाला भेट द्यावी.नियुक्त होपणाऱ्या उमेदवाराला त्यांच्या अनुभवाच्या आधारावर वेतन पुरवले जाईल. एकंदरीत, या रिक्त पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला मासिक वेतन २१,७०० रुपये ते ६९,१०० रुपयांच्या (Level-3) दरम्यान असेल. या भरतीमध्ये उमेदवारांच्या नियुक्तीसाठी निवडप्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या निवड प्रक्रियेमध्ये मुख्य परीक्षेचा समावेश आहे. अद्याप, या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र होणे आवश्यक आहे. या अटी शर्ती उमेदवाराच्या शिक्षणासंबंधित आहेत. तसेच एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना अय भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. किमान २१ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २७ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ५४५ रिक्त जागांमधील २०९ जागा UR क्ष्रेणीसाठी आरक्षित आहे. ७७ रिक्त पदे SC साठी तर ४० रिक्त पदे ST या आरक्षित प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी १६४ रिक्त पदे राखीव आहेत. EWS आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी ५५ जागा राखीव आहेत.
हे देखील वाचा : PGWP मध्ये करण्यात आला बदल; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
तर ITBP च्या या भरती प्रक्रियेमध्ये Physical Efficiency Test (PET), Physical Standards Test (PST), लेखी परीक्षा, दस्तऐवजांची पडताळणी, ड्रायविंग टेस्ट आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. उमेदवारांना या सर्व बाबी पात्र कराव्या लागतील. या सगळ्या टप्प्यांमध्ये पात्र उमेदवारा नियुक्तीस पात्र ठरेल.