UGC NET (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA)
UGC NET June 2025 Results: UGC NETची परीक्षा जून महिन्यात घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवार UGC NET निकाल ugcnet.nta.ac.in या वेबसाईटवर बघू शकता. चला जाणून घेऊया प्रक्रिया
ई-कॉमर्स कंपनी Amazon मध्ये ‘या’ पदासाठी रिक्त जागा; पदवीधरांसाठी उत्तम संधी, पगार किती?
निकाल तपासण्याची प्रक्रिया
१. सर्वप्रथम, उमेदवाराला अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in ला भेट द्यावी लागेल.
२. यानंतर, उमेदवाराला होम पेजवरील UGC NET निकाल २०२५ लिंकवर क्लिक करावे लागेल.
३. यानंतर तुम्हाला लॉगिन डिटेल्स प्रविष्ट करावे लागतील.
४. आता तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर उघडेल.
५. आता तुमचा निकाल डाउनलोड करा.
६. भविष्यासाठी निकालाची प्रिंटआउट घेण्यास विसरू नका.
UGC NET जून २०२५ परीक्षा कधी घेण्यात आली?
युजीसी नेट परीक्षा ८५ विषयांसाठी घेतली जाईल. देशभरातील विद्यापीठे आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्युनियर प्रोफेसर फेलोशिप (जेआरएफ) आणि असिस्टंट प्रोफेसर आणि पीएचडी प्रवेशासाठी पात्रता मिळविण्यासाठी वर्षातून दोनदा युजीसी नेट परीक्षा घेतली जाते. यावेळेस UGC NET जून २०२५ ची परीक्षा २५ ते २९ जून २०२५ या कालावधी दरम्यान घेण्यात आली. ही परीक्षा CBT मोडमध्ये दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ पर्यंत होती. तर दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते सायंकाळी ६ या कालावधीमध्ये घेण्यात आली.
NTA ने ५ जुलै २०२५ रोजी UGC NET जून २०२५ परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की जारी केली. ६ जुलै २०२५ ते ८ जुलै २०२५ या कालावधीत उमेदवारांना आक्षेप नोंदवण्यासाठी आक्षेप विंडो उघडण्यात आली होती. उमेदवारांनी दाखल केलेल्या आक्षेपांची तपासणी विषय तज्ञांच्या पॅनेलद्वारे केली जाईल. विषय तज्ञांच्या मतानुसार अंतिम उत्तर की तयार केली जाईल आणि त्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) लवकरच यूजीसी नेट जून २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते. म्हणून, उमेदवारांना नियमितपणे वेबसाइटला भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सीबीएसई बोर्डाच्या १०वी-१२वी पुरवणी परीक्षा उद्यापासून; प्रवेशपत्र जारी
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १०वी आणि १२विच्या पुरवणी परीक्षेला सुरवात होणार आहे. येत्या मंगळवारपासून ही परीक्षा सुरु होणार आहेत. बॉर्डरने वेळापत्रकही जाहीर केले आहे. उमेदवार https://www.cbse.gov.in/cbsenew/cbse.html या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर बघू शकणार. या पुरवणी परिसक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने काही आवश्यक सुचना दिल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विध्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे संप्रेषण उपकरण घेऊन जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर कोणताही विध्यार्थी परीक्षा केंद्रात या उपकरणासह पकडला गेला तर UFM (अनफेअर मीन्स) नियमांनुसार संबंधित उमेदवारावर कठोर कारवाई केली जाईल.
SBI PO Vacancy 2025: SBI PO साठी एकूण 541 जागांसाठी भर्ती; अर्ज करण्याची शेवटची तारीख आज