फोटो सौजन्य - Social Media
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) गुवाहटीमध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. AIIMS गुवाहटीची ही भरती प्रक्रिया शैक्षणिक क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी अगदी सोन्याची संधी ठरणार आहे. एकंदरीत, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) या संस्थेत शिक्षक पदी काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभाग होता येणार आहे. निवडीत उमेदरांना प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर तसेच असोसिएट प्रोफेसर पदी काम करता येणार आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS), गुवाहटीच्या या प्रोफेसर पदांच्या भरती संबंधित अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये प्रोफेसर पदाच्या विविध रिक्त जागांना भरण्यासाठी आयोजित भरती प्रक्रियेसंबंधित सखोल माहितीचा आढावा घेता येणार आहे. या अधिसूचनेचा आढावा घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS)च्या aiimsguwahati.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
हे देखील वाचा : IIT बॉंबेच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी प्लेसमेंट; विद्यार्थ्यांना मिळणार लाखोंचे पॅकेज
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS), गुवाहटीने आयोजित केलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत सहभाग घेऊ पाहणाऱ्या उमेदवारांना १३ सप्टेंबर, २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेला सुरुवात ऑगस्टच्या २३ तारखेपासून सुरु झाली आहे. अनेक उमेदवारांनी या पदासाठी अर्ज नोंदवण्यास सुरु केले आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज करण्याचे निर्देश ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) ने दिले आहेत.
या भरती प्रक्रियेमध्ये अतिरिक्त प्रोफेसरसाठी ०२ जागा, असिस्टंट प्रोफेसरसाठी ०३ जागा तर असोसिएट प्रोफेसर पदासाठी ०६ जागेंचा समावेश आहे. एकंदरीत, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS), गुवाहटीने आयोजित केलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण ११ रिक्त जागांचा विचार केला जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
हे देखील वाचा : IIIT अलाहाबादमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदी भरती सुरु; असे करता येईल अर्ज
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 1500 रुपये अर्ज शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. एससी/एसटी/दिव्यांग तसेच महिला उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. एकंदरीत, एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवार, दिव्यांग उमेदवार तसेच दिव्यांग उमेदवार निशुल्क अर्ज करू शकतात.