फोटो सौजन्य - Social Media
प्रत्येकाला आराम करण्याची आवड असते. काही लोक दिवसभर कामे करून थकून जातात, त्यामुळे त्यांना आराम करणे भाग असते. परंतु, काही जण इतके आळशी असतात कि आराम करणे त्यांच्या आयुष्याचा सगळ्यात महत्वाचा भाग बनून जातो. आरामाशिवाय ते दोन मिनिटेही दूर राहू नाही शकत. जणू आराम त्यांचा सगळ्यात आवडता छंदच बनला आहे. मुळात, छंद एखाद्या रिज्युमे मधील महत्वाचा भाग असतो.
आपल्या रिज्युमेमध्ये आपल्या छंदाचा उल्लेख करणे आवश्यक असते. अशा वेळी आपल्या अंगातील सर्व गुणांचा उल्लेख रिज्युमेमध्ये करणे कधीही उत्तम असते. याने समोरच्याला आपले व्यक्तिमत्व ओळखण्यास सोपे होते. परंतु, अनेक वेळा लोकं आपल्या वाईट बाजू मांडत नाहीत. तर, आपल्या चांगल्या बाजू अगदी वाढवून चढून मांडत असतात. परंतु, आता असे करण्याचे काहीच गरज नाही.जर एखाद्याला फार आळस आहे आणि नेहमी आराम करण्याची सवय आहे. तर त्याचा हा छंद त्याला लक्षधीश बनवू शकतो. तुमची झोप तुम्हाला लाखांचा नफा करून देऊ शकते. कसे? तर चला, जाणून घेऊयात.
हे देखील वाचा : AWES आर्मी स्कुलमध्ये शिक्षक पदांची भरती; लवकर जाहीर होणार अधिसूचना
सध्या नवीन जॉबच्या या प्रकाराची सर्वत्र फार चर्चा होताना दिसत आहे. या नोकरीमध्ये उमेदवार फक्त ८ ते ९ तासांची झोप काढून लाखो कमवू शकतो. नोकरीची ही संधी इंडियन होम एंड स्लीप सॉल्यूशन ब्रांड वेकफीटने आणली आहे. फक्त झोपेसाठी वेकफीट कंपनी उमेदावाराला १० लाख रुपये देणार असल्याचे सांगितले जात आहे. जर तुम्ही या कामासाठी इच्छुक आहात तर तुम्हाला काही अटी शर्ती मंजूर करणे भाग आहे. या अटी शर्ती ना वयोमर्यादेच्या आहेत आणि ना ही शिक्षणाच्या. या कामासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना जास्त शिक्षित असणे गरजेचे नाही. अट एकच कि उमेदवाराला झोपण्याची आवड असावी. उमेदवाराला दिवसातून ८ ते ९ तास झोपावे लागणार आहे. तसेच दरम्यान २० मिनिटांची डुलकीही मारावी लागणार आहे.
वेकफीटने स्लिप इंटर्नशिप सुरु केली आहे. यामध्ये नवीन इंटर्न्सला एक लाखापर्यंत रक्कम मिळू शकते. तर चॅम्पियन स्लिपरला १० लाखांची रक्कम देण्याचे कंपनीने सांगितले आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी वेकफीटच्या लिंक्डइन प्रोफाइलला भेट द्या. काही जणांचे म्हणणे असे आहे की ही नोकरीची संधी एक मार्केटिंंग स्टंट आहे.