देशाच महिलासंबधीत गुन्हे घडण्याचं प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. दररोज महिलांवरील अत्याचार, प्रेमसंबधातून वाद होऊन हत्या असे गुन्हे उघडकीस येत आहे. आतासायबर सिटी गुरुग्राममध्यून (Gurugram) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुग्राममध्ये एका तरुणाने त्याच्या लिव्ह इन पार्टनरवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी (Attack On Live In Partner) दबाव टाकला. तिने विरोध केल्याने त्याने तिच्या मानेवर व चेहऱ्यावर स्क्रू ड्रायव्हरने (attack with screwdrive) वार केले. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
[read_also content=”यूकेत सात बाळांचा जीव घेतल्या प्रकरणी नर्स ठरली दोषी, भारतीय वंशाच्या डॉक्टरची साक्ष ठरली महत्त्वाची! https://www.navarashtra.com/world/indian-doctor-help-to-catch-nurse-who-killed-7-babies-in-hospital-at-uk-nrps-446644.html”]
सायबर सिटी गुरुग्राममधील नाहरपूर रुपा भागात एका २८ वर्षीय तरुणीवर तिच्या लिव्ह इन पार्टनरने स्क्रू ड्रायव्हरने जीवघेणा हल्ला केला. ही घटना गुरुवारी दुपारी ४ वाजता घडली. युपीचा राहणारा शिवम तिच्या घरी पोहोचला तेव्हा मुलगी तिच्या घरी होती. तो तरुणीवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागला. तरुणीने विरोध केला असता तरुणाने तिच्या मानेवर आणि चेहऱ्यावर स्क्रू ड्रायव्हरने वार केले.
एसीपी क्राइम वरुण दहिया यांनी सांगितले की, आरोपी शिवमला अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत शिवम आणि मुलगी एक वर्षापासून लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे समोर आले आहे. दोघेही यूपीचे रहिवासी आहेत. शिवम लग्नाच्या बहाण्याने मुलीचे लैंगिक शोषण करायचा.
पोलिसांचे म्हणणे आहे की, जेव्हा पीडितेला कळले की शिवमचे केवळ लग्न झालेले नाही, तर तिला दोन मुले देखील आहेत, तेव्हा तिने स्वतःला आरोपीपासून दूर केले. ती नाहरपूर परिसरात भाड्याच्या खोलीत राहू लागली. ही बाब आरोपींना मान्य नव्हती. तो तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता. तो सतत तिचा पाठलाग करुन तिला त्रास देत होता. यानंतर गुरुवारी दुपारी चार वाजता तो नाहरपूर परिसरातील मुलीच्या घरी पोहोचला आणि तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकू लागला.
पीडित मुलीने विरोध केला असता आरोपीने जीवघेणा हल्ला केला. पीडितेला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३२३, ३२४ आणि ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे एसीपी क्राइमचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.