Ahmedabad Mass Suicide: दिल्लीतील बुराडी आणि हरियाणातील पंचकुलात घडलेल्या सामुहिक आत्महत्यांच्या प्रकरणांनी संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. त्या घटनांची आठवण करून देणारी आणखी एक खळबळजनक घटना गुजरातमधील अहमदाबादमधून समोर आली आहे. अहमदाबादेत एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मृतांमध्ये पती-पत्नी, त्यांची दोन मुली आणि एक मुलगा यांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
सध्या या सामूहिक आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट असून, पोलिसांनी सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास सुरू केला आहे. आत्महत्येच्या पाठीमागील कारणांचा शोध घेण्यासाठी कुटुंबाच्या पार्श्वभूमीचा, आर्थिक परिस्थितीचा आणि इतर बाबींचा सखोल तपास करण्यात येत आहे.
बनावट अमूल बटरच्या उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची धाड, भिवंडीतील धक्कदायक प्रकार समोर
गुजरातमधील अहमदाबाद ग्रामीण भागातील बावळा येथे एका भाड्याच्या घरात राहणाऱ्या कुटुंबातील पाच जणांनी विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अहमदाबाद ग्रामीणचे पोलिस अधीक्षक (एसपी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारे कुटुंब मूळचे ढोलका येथील रहिवासी होते.
मृतांमध्ये पती विपुल कांजी वाघेला (३४), पत्नी सोनल (२६), त्यांची दोन मुली (११ आणि ५ वर्षे) आणि एक मुलगा (८ वर्षे) यांचा समावेश आहे. सध्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या किंवा इतर कोणतीही पार्श्वभूमी होती का, याची चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गुजरातमधील अहमदाबाद ग्रामीणच्या बावळा परिसरात एका कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. मृतांमध्ये पती-पत्नीसह त्यांच्या तीन लहान मुलांचा समावेश आहे.
Curved Display वाला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? OnePlus पासून Oppo पर्यंत, हे आहेत बेस्ट
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक टीमसह पोलीस पथकाने संबंधित घराची झडती घेतली असून, घटनास्थळी पुरावे गोळा केले जात आहेत. त्याचबरोबर आजूबाजूच्या शेजाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. हे कुटुंब मूळचे कुठून आले होते, ते बावळ्यात का राहत होते, याचाही तपास केला जात आहे.
गुजरातमध्ये याआधीही अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. ८ जून २०२५ रोजी मेहसाणा जिल्ह्यातील काडी गावाजवळ एका जोडप्याने आर्थिक अडचणींमुळे त्यांच्या ९ वर्षांच्या मुलासह नर्मदा कालव्यात उडी मारून आत्महत्या केली होती. मृतांमध्ये ३८ वर्षीय धर्मेश पांचाळ, त्यांची पत्नी उर्मिला (३६) आणि मुलगा प्रकाश (९) यांचा समावेश होता. धर्मेशच्या गाडीतून पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली होती, ज्यात आर्थिक अडचणींचा उल्लेख करण्यात आला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक तणावाखाली होते.