संग्रहित फोटो
हर्ष राठोड, स्वप्नील राठोड, संकेत राठोड, सोन्या अशी चाकू हल्ला करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात प्रितमसिंग देविचंद बारवाल (वय २२, रा. भगतसिंगनगर, हसुल) याने फिर्याद दिली आहे.
प्रितमसिंग हा एका नामांकित महाविद्यालयात एलएलबीच्या द्वितीय वर्षात शिकतो. १३ ऑक्टोबर रोजी त्याचा मित्र सौरभ पाटील याचे हर्ष राठोड व स्वप्निल राठोड यांच्याशी महाविद्यालय परिसरात भांडण झाले होते. त्यावेळी प्रितमसिंगने मध्यस्थी करून भांडण सोडवले होते. शनिवारी दुपारी प्रितमसिंग हा मित्र दिग्विजयसोबत दुचाकीवरून जात असताना हर्षने बुलेट आडवी लावून त्याला रोखले. त्याच्यासोबत स्वप्निल, संकेत राठोड आणि सोन्या असे तिघे होते. हर्षने जुन्या भांडणाचा जाब विचारत चाकूने प्रितमसिंगवर वार करण्याचा प्रयत्न केला. प्रितमसिंगने चाकू हाताने पकडल्याने त्याच्या बोटांना गंभीर दुखापत झाली. मित्राच्या मदतीला धावलेल्या दिग्विजयला स्वप्निल व संकेत यांनी पकडले. त्यानंतर सोन्याने दिग्विजयच्या डाव्या मांडीवर व उजव्या कोपरावर चाकूने वार केले. नागरिक जमा होऊ लागल्याने चौघेही आझाद चौकाच्या दिशेने पसार झाले. या प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार गताप करत आहेत.
हे सुद्धा वाचा : डिस्काउंट न दिल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यावर पिस्तूल रोखले; मोशीत खळबळ
पुण्यातील वडारवाडी परिसरात खळबळ
जुन्या वैमनस्यातून झालेल्या वादाचे पर्यवसान हल्ल्यात झाल्याची घटना शिवाजीनगरमधील वडारवाडी परिसरात घडली आहे. एका व्यक्तीच्या गळ्यावर ब्लेडने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी मोहन बळवंत विटकर (वय ३६, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) याला अटक केली आहे. या हल्ल्यात राहुल शिवराम डोंगरे (वय ४०, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी डोंगरे यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Ans: छत्रपती संभाजीनगरमधील एन-६ सिडको परिसरात सैलानी बाबा व्हील अलाइनमेंट सेंटरसमोर १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ही घटना घडली.
Ans: महाविद्यालयात झालेल्या जुन्या भांडणात विद्यार्थ्याने मध्यस्थी करून वाद मिटवला होता. याचाच राग मनात धरून चौघांनी त्याला अडवून चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.
Ans: या हल्ल्यात एलएलबीचा विद्यार्थी प्रितमसिंग बारवाल याच्या उजव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली, तर त्याचा मित्र दिग्विजय याच्यावरही चाकूने वार करण्यात आले. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






