सौजन्य - सोशल मिडीया
गुरुवारी जीवनला त्वचा विकाराचा त्रास सुरू झाला. यावर शाळा व्यवस्थापनाने त्याच्या वडिलांना तातडीने बोलावून घेतले आणि तो पूर्णपणे बरा होईपर्यंत ३- ४ दिवस त्याला गावी घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता अशी माहिती आहे. मात्र, वडिलांनी मुलाला बाहेर डॉक्टरांकडे नेऊन प्राथमिक उपचार केले आणि अवघ्या दोन तासांतच त्याला पुन्हा सैनिकी शाळेत आणून सोडले. गावी जाता येत नसल्याचे आणि पुन्हा त्याच वातावरणात राहावे लागत असल्याचे समजताच जीवन अत्यंत निराश झाला व रडू लागला. त्यावेळी सर्व मुले बाहेर मैदानात होती, तो ७ ते ८ मिनिटे रडतच होता, त्याने वसतिगृहातील कॉटजवळ कपडे वाळत घालण्यासाठी बांधलेल्या नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.
सीसीटीव्ही फुटेजवरून उलगडा
सुरुवातीला पालकांकडून शाळा व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचे आरोप केले जात असतानाच, ही संपूर्ण हृदयद्रावक घटना शाळेतील कॅमेरात कैद झाली आहे. पोलिस व शाळा प्रशासनाने हे सर्व फुटेज मृत जीवनच्या पालकांना प्रत्यक्ष दाखवले. त्यात तो रडत असून त्यानेच आत्महत्या केल्याचे त्या फुटेजमधून स्पष्ट झाल्याची माहिती रामनगर ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिली.






